घरदेश-विदेशLive Update : KKR VS RCB : कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्नेस...

Live Update : KKR VS RCB : कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्नेस विजय

Subscribe

KKR VS RCB : कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्नेस विजय

29/3/2024 22:48:21

- Advertisement -

काँग्रेसचे वर्धा जिल्ह्यातील माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश

29/3/2024 21:13:33

- Advertisement -

निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा

29/3/2024 19:29:45


KKR VS RCB : कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकले; गोलंदाजीचा निर्णय

29/3/2024 19:3:35


मध्य रेल्वेवर 31 मार्च रोजी मेगा ब्लॉक

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीमी मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक

नेरुळ/बेलापूर-उरण बंदर मार्ग वगळून पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक

29/3/2024 18:17:31


ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारांची घोषणा

नांदेडमधऊन अविनाश भोशीकर, परभणीतून हरीभाऊ शेळके, हिंगोलीतून रवी शिंदे, यवतमाळ-वाशिममधून प्रशांत बोडखे यांना उमेदवारी जाहीर

29/3/2024 18:2:33


प्रहार संघटनेकडून दिनेश बुब यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर

नवनीत राणांविरोधात होणार लढत

29/3/2024 16:31:43


नाशिकमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात

29/3/2024 11:57:41


संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी

बैठकीत काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप

मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक घेण्यात आली होती

29/3/2024 11:53:46


अमोल कीर्तिकरांना ईडीचे दुसरे समन्स

ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने दुसरे समन्स बजावले आहे.

29/3/2024 10:0:19


आयकर विभागाची काँग्रेसला 1700 कोटींची नोटीस

काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या. व्याज आणि दर मिळून एकूण 1700 कोटींची नोटीस आयकर विभागाने आकारली


माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अलिबाग येथील पेझारी येथे होणार अंत्यसंस्कार

29/3/2024 8:53:32


दक्षिण आफ्रिकेत बस पुलावरून दरीत कोसळली; 46 प्रवाशांपैकी 45 जण ठार

दक्षिण आफ्रिकेत एक भीषण बस अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत एक पुलावरून बस 50 मिटर खाली दरीत कोसळली, ज्यामध्ये बसमधील 46 पैकी 45 प्रवासी ठार झाले आहेत. या दुर्घटनेत फक्त एक आठ वर्षीय मुलगी बचावली असून तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुख्य सचिव पदासाठी प्रस्तावित नावं निवडणूक आयोगाने फेटाळली

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. नितीन करीर यांना मुख्य सचिव म्हणून केवळ 3 महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. राज्य सरकारने दिलेली तीन नावं, सुजाता सौनिक, राजेशकुमार मीना, इकबालसिंह चहल निवडणूक आयोगाने फेटाळली आहेत.

29/3/2024 7:46:31


एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याच्या आरोपात प्रफुल पटेल यांना सीबीआयचा मोठा दिलासा.

प्रफुल पटेल हे युपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. तेव्हा त्यांच्यावर एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप होता. त्यांच्या या धोरणामुळे सरकारचं 840 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2017 ला सर्व कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. प्रफुल पटेल गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी झाले. त्यानंतर आता हा तपास बंद करण्यात आला आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -