Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मराठी विकासकांना ताकद देण्याची गरज : प्रवीण दरेकर

मराठी विकासकांना ताकद देण्याची गरज : प्रवीण दरेकर

Subscribe

मराठी विकासकाला सहकार्य करणे, ताकद देणे आवश्यक आहे. त्यांना आपण ताकद दिली तर ते तुम्हाला ताकद देतील. असे करून हा जो मराठी विकासक आहे तो भविष्यात वाढवायचा आहे. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ते सहकार्य मी आणि गणेश नाईक निश्चित उभे करू, असा विश्वासही दरेकर यांनी दिला.

 

नवी मुंबईः मराठी माणूस विकासक म्हणून पुढे आला पाहिजे. त्यांना संघटित केले पाहिजे. त्यांच्या अडचणीवर चर्चा करत त्यांना ताकद दिली पाहिजे. या भावनेतून आपण मराठी माणसासाठी उभी केलेली संघटना ही निश्चित कौतुकास्पद आहे. मराठी विकासकांना ताकद देण्याची, सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनतर्फे नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पुनर्विकासकावर चर्चासत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार दरेकर म्हणाले, मुंबई ही खरी स्वप्न नगरी आहे. तिथे आज मराठी विकासक घुसमटत आहे. तिथे असणारी व्यापक कार्यक्षेत्र, तेथील जग यात तिथल्या मराठी विकासकाला सहकार्य करणे, ताकद देणे आवश्यक आहे. त्यांना आपण ताकद दिली तर ते तुम्हाला ताकद देतील. असे करून हा जो मराठी विकासक आहे तो भविष्यात वाढवायचा आहे. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ते सहकार्य मी आणि गणेश नाईक निश्चित उभे करू, असा विश्वासही दरेकर यांनी दिला.

आज मी बॅंकिंग क्षेत्रात असल्याने अनेक उद्योग व्यवसायाशी माझा संबंध येतो. सेल्फ डेव्हलपमेंट हा पुनर्विकासाचा कन्सेप्ट मी मुंबईत आणला. एखादी इमारत पडायला आली तर आपण विकासकाकडे जातो. मी स्वयंपूनर्वीकासाची योजना आणली. सेल्फ डेव्हलपमेंटला फंडीत केले. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था रजिस्ट्रर आहेत, ज्या मुंबई जिल्हा बँकेच्या सभासद आहेत त्यांनी आपल्याकडे कर्ज मागायचे. संस्थेच्या मार्फत विकास करायचा. अशा प्रकारे ४ इमारती उभ्या केल्या आहेत. शेवटी आरबीआयला धोरण बनवावे लागले. आज देशपातळीवर आरबीआयनेही सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात बँकांना गृहनिर्माण संस्थांना पैसे देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

आमदार गणेश नाईक, विकासक सुरेश हावरे, रामचंद्र घरत, असोसिएशनचे अध्यक्ष आनंद पाटील आणि महासचिव हितेश सावंत, अजित येलमार, विजय निकम आदी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -