घरमहाराष्ट्रमविआ सरकार दारुड्यांची काळजी घेतेय; वाईन विक्रीच्या निर्णयावर प्रवीण दरेकरांची टीका

मविआ सरकार दारुड्यांची काळजी घेतेय; वाईन विक्रीच्या निर्णयावर प्रवीण दरेकरांची टीका

Subscribe

राज्यातील सुपर मार्केटमध्ये(Wine in super market)  वाईन विकण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळात वाईन विक्रीबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयावरून आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार टीकेची झोड उठवली आहे. मविआ सरकार दारुड्यांची काळजी घेतेय असं म्हणत सरकारच्या वाईन विक्रीवर प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, “राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे हे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे. उद्याची पिढी बरबाद कशी होईल याची या सरकारला पर्वा दिसत नाही. शेतक-यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करत आहे.”

- Advertisement -

“बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणासारख्या पवित्र मंदिरांची काळजी. ना तेथील लोकांची काळजी परंतु दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त करणा-यांना हे सरकार अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत आहे. हा निर्णय म्हणजे भरकटलेल्या सरकारने घेतलेला निर्णय असल्याची” जोरदार टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.


अनुप डांगे प्रकरणी परमबीर सिंह यांना एसीबीकडून समन्स; 2 फेब्रुवारीला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -