घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपरराज्यातील मद्यसाठ्याची चोरटी वाहतूक रोखली; ९० लाख, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

परराज्यातील मद्यसाठ्याची चोरटी वाहतूक रोखली; ९० लाख, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क येवला विभागाच्या पथकाने नाशिक-छत्रपती संभाजी नगर रोडवर भरवस फाटयाजवळ परराज्यातील मद्यसाठयाची चोरटी वाहतूक रोखली. पथकाने कंटेनरचालकास अटक केली. पथकाने त्याच्या ताब्यातून ५०१ बॉक्समधील १७ हजार २३२ बाटल्या असा एकूण ८० लाख ७० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रमजान खान सलमान खान (वय २७, रा. नसीरपूर, पो. पृथ्वीगंज, राणीगंज, प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क, येवला विभागाच्या पथकाला शुक्रवारी (दि.१) नाशिकसह महाराष्ट्र विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्यसाठ्याची वाहतूक एका सहाचाकी कंटेनरमधून होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार येवला विभागाने वेगवेगळी पथके तयार करून येवला-विंचूर शहर परिसरात सापळा रचला. संशयित वाहनाचा शोध घेत असताना पथकास भरवस फाटा चौफुली येथे एक संशयित आयशर कंपनीचा पॅक बॉडी कंटेनर दिसला. येवला विभागाच्या पथकाने नाकाबंदी व पाठलाग करून कंटेनरची तपासणी केली असता भरवस फाट्याजवळ, नाशिक-छत्रपती संभाजी नगर रोड, भरवस (ता. निफाड) या ठिकाणी रात्रीच्या वेळी विजेरीच्या सहाय्याने थांबवले. पथकाने कंटेनरचालकाकडे विचारणा केली असता त्याने मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.

- Advertisement -

पथकाला संशय बळावल्याने कंटेनर(एमएच ०४-आरबी ४८६८)ची तपासणीसाठी कंटेनरचा मागील दरवाजा उघडला. त्यावेळी पथकास महाराष्ट्रात प्रतिबंधित व दादर नगर हवेली आणि दमण दिवमध्ये विक्रीसाठी असलेला मद्यसाठा आढळून आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक ए. एस. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभागाचे निरीक्षक विठ्ठल अमृता चौरे, दुय्यम निरीक्षक संजय रंगनाथ वाकचौरे, प्रविण मंडलिक, अवधूत पाटील, संतोष मुंढे, विठ्ठल हाके, अमन तडवी, मुकेश निंबेकर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -