घरताज्या घडामोडी12th Exam Result : पुण्यातील एका विद्यार्थ्याला मिळाले 15 टक्के; झाला ट्रोल

12th Exam Result : पुण्यातील एका विद्यार्थ्याला मिळाले 15 टक्के; झाला ट्रोल

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज १२वीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये ९१.२५ टक्के विद्यार्थी पास झाले असून, अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. नापास झालेले विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज १२वीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये ९१.२५ टक्के विद्यार्थी पास झाले असून, अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. नापास झालेले विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, याच नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांनी त्याला मिळालेल्या टक्क्यांवरून चांगलंच ट्रोल केले आहे. या विद्यार्थ्याचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नापास झालेला हा विद्यार्थी पुणे विभागातील असल्याचे त्याला समजते. या विद्यार्थ्याला केवळ १५.३३ टक्के एवढे सरासरी मार्क मिळाले आहेत. इंग्रजी विषयात ९ मार्क, मराठी विषयात २५ मार्क, हिंदीमध्ये २० मार्क, इतिहास विषयात २२ मार्क, राज्य शास्त्र या विषयामध्ये १३ मार्क आणि अर्थशास्त्र विषयामध्ये अवघे ३ मार्क या विद्यार्थ्याला मिळाल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

या विद्यार्थ्याचा निकाल पाहताच त्याच्या मित्रांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. तसेच, १२ वीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या निकालाचा हा फोटो सोशल मीडियावर स्टेटसला ठेवला आहे. त्याला अनेक मित्रांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. त्याचे अनेक मित्रांनी अभिनंदनही केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 2.5 लाखांत घर; फडणवीसांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -