घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील 'या' बँकेचे 'दि कॉसमॉस को-ऑप' बँकेत होणार विलीनीकरण

पुण्यातील ‘या’ बँकेचे ‘दि कॉसमॉस को-ऑप’ बँकेत होणार विलीनीकरण

Subscribe

राज्यातील सहकारी क्षेत्रातील दि कॉसमॉस को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने श्री शारदा सहकारी बँकेचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च 2021 मध्य़े सहकारी बँकांच्या विलीनीकरणबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार भारतातील सहकारी क्षेत्रातील हे पहिलेच विलिनीकरण आहे. अशी माहिती कॉसमॉस बँकेचे संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

सध्या श्री शारदा सहकारी बँकेची व्यावसायिक उलाढाल जवळपास 550 कोटी आहे. याबाबत कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सचिन आपटे म्हणाले की, राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणामुळे होणाऱ्या त्यांच्या समन्वयाचे फायदे घेण्यासाठी, ग्राहकसेवा वाढविण्यासाठी आणि बँकांची क्षमता वाढविण्यासाठी म्हणून भारत सरकारने राष्ट्रीयकृत बँकांची विलिनीकरण केले, त्यासोबत अर्बन को – ऑफ बँकांची सुद्धा विलिनीकरणे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित आहे. त्याप्रमाणे परिपत्रक आल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये या दोन्ही बँकांनी विलिनीकरणाबाबत सकारात्मक विचार करून परिपत्रकानुसार हा विलिनीकरण प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दाखल केला.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेने या प्रस्तावास 14 ऑक्टोबर 2022 रोजी मान्यता दिली. त्यानुसार 30 ऑक्टोबर 2022 पासून विलिनीकरण योजना अंमलात आणली गेली आहे. बदलत्या काळानुसार छोट्या सहकारी बँकांना त्यांचे अकाऊंट होल्डर टिकवायचे असल्यास आणि नफा-खर्चाचे योग्य व्यवस्थापन हवे असल्यास अशा प्रकारची विलिनीकरणे मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज आहे. या गोष्टी लक्षात घेता दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी त्वरीत विलिनीकरणाचा योग्य निर्णय घेतला.

या विलीनीकरणामुळे आता शारदा बँकेच्या खातेदार, ठेवीदार आणि कर्जदारांना मिळत असलेल्या सेवांपेक्षा जलद, आधुनिक आणि सुरक्षित सेवा देण्यावर कॉसमॉस बँकेचा भर असेल. या विलिनीकरणामुळे आता कॉसमॉस बँकेच्या 152 शाखा झाल्या आहेत.

- Advertisement -

पुणे शहरात आता कॉसमॉस सर्वात जास्त शाखा असणारी बँक झाली असून आत्तापर्यंत कॉसमॉस बँकेने एकूण 16 बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. आता या विलीनीकरणामुळे शारदा बँकेच्या सर्व आठ शाखांमधून खातेदारकांना कॉसमॉस बँकेच्या नेट बँकींग, मोबाईल बँकींग व्हॉट्सअॅप बँकींग अशा सर्व अत्याधुनिक सेवांचा लाभ सर्व मिळणार आहे. कॉसमॉस बँकेच्या 7 राज्यात शाखा असून या राज्यातील सर्व शाखांमधून विविध प्रकारचे बँकींग व्यवहार करण्याची सुविधा बँकेच्या सध्याच्या सर्व खातेदारांना मिळणार आहे.


कोरोना काळात खोके खाऊन, माजले बोके; आशिष शेलारांचे ठाकरेंवर टीकास्त्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -