Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी एसटीची मागची दोन्ही चाकं निखळली आणि ३५ प्रवासी...; पुणे-नाशिक मार्गावरील थरार

एसटीची मागची दोन्ही चाकं निखळली आणि ३५ प्रवासी…; पुणे-नाशिक मार्गावरील थरार

Subscribe

एसटी महामंडळाच्या (MSRTC) एका बसची मागील दोन्ही चाकं निखळल्याची धक्कादायक घटना पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) आंबेगाव तालुक्यात घडली. चाकं निखळ्यानंतर बसचे एक चाक पुढे आणि दुसरे चाक रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात पडले.

एसटी महामंडळाच्या (MSRTC) एका बसची मागील दोन्ही चाकं निखळल्याची धक्कादायक घटना पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) आंबेगाव तालुक्यात घडली. चाकं निखळ्यानंतर बसचे एक चाक पुढे आणि दुसरे चाक रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात पडले. या बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील ३५ प्रवासी सुखरुप बचावले. (pune nashik highway wheels of the running msrtc bus suddenly came out)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या शेवळेवाडी परिसरात एसटी बसची मागील दोन्ही चाकं अचानक निखळली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. जवळपास १५ ते २० सेकंद ही बस रस्त्यावर धावत होती. त्यानंतर बस तिरकी होऊन रस्त्यावरच धावत होती. चाकं निखळल्याने या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरड सुरू झाली. या घटनेमुळे बसमधील सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

मुंबईतील परळ एसटी डेपोतील बस क्रमांक एमएच १२ बीएल ३६१८ ही बस परळवरुन नारायणगावाकडे निघाली होती. त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. एसटी बसचे चाकं निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत बसची दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस चारच चाकांवर घासत पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

चाकं निखळल्यानंतर बसची चेसी घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. मात्र, हा प्रकार चालकाच्या वेळीच लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. याप्रकरणाची सध्या तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार देण्यात यावे; विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे मागणी

- Advertisment -