Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ओशो आश्रम प्रशासन अन् अनुयायांमध्ये 'या'मुळे पेटला वाद; संबोधी दिनाला गालबोट

ओशो आश्रम प्रशासन अन् अनुयायांमध्ये ‘या’मुळे पेटला वाद; संबोधी दिनाला गालबोट

Subscribe

पुणेः सन्यासी माळा घालून येणाऱ्या अनुयायांना मनाई केल्याने ओशो आश्रमात मंगळवारी धुमचक्री झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे संबोधी दिनाला गालबोट लागले आहे.

ओशो यांचे जगभरात असंख्य अनुयायी आहेत. २१ मार्च हा संबोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनुयायी पुणे येथील आश्रमात येतात. त्यानुसार मंगळवारीही अनुयायी ओशो आश्रमात आले होते. त्यावेळी सन्यासी माळा घातलेल्या अनुयायांना आश्रम व्यवस्थापनाने प्रवेश नाकारला. त्यामुळे १५० ते २०० अनुयायांनी गेट तोडून आश्रमात प्रवेश केला. अनुयायी आक्रमक झाल्याने आश्रमात तणावाचे वातावरण होते. कोरोगाव पार्क पोलीस तत्काळ आश्रमात दाखल झाले. पोलिसांनी अनुयायांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. ही धुमचक्री रोखण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

- Advertisement -

दरम्यान, ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनावर मध्यंतरी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. ओशोच्या ७ अनुयायांनी ओशो फाउंडेशनच्या ट्रस्टी आणि मॅनेजमेंटवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. ओशो फ्रेंड्स फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश ठक्कर यांनी पुण्यातील कोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये एक लिखित पत्र देऊन तक्रार दाखल केली होती. परदेशातील ओशोंच्या अनुयायांकडून पुणे स्थित ओशो आश्रमातील कार्यासाठी डोनेशन घेतले जाते. परंतु चॅरिटी कमिश्नर या डोनेशनमधील सर्वाधिक पैशांचे व्यवहार फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटच्या कोणत्याही परवानगीशिवाय भारतबाहेर अवैध्यरित्या करत आहेत. पब्लिक ट्रस्ट प्रॉपर्टीच्या गैरव्यवहाराचे हे एक उत्तम असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

या फाउंडेशनच्या व्य़वहारांसंदर्भात सखोल चौकशी केल्यास एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा उघडकीस येईल. त्यामुळे याची ईडी व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयापर्यंतही हे प्रकरण पोहोचले होते. त्यामुळे पुण्यातील ओशोंचे हे आश्रम नेहमीच चर्चेत राहिले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -