घरमहाराष्ट्रपुणेTongue Cancer : डॉक्टरांनी रुग्णाच्या छातीच्या स्नायूपासून बनवली कृत्रिम जीभ, कठीण शस्त्रक्रिया...

Tongue Cancer : डॉक्टरांनी रुग्णाच्या छातीच्या स्नायूपासून बनवली कृत्रिम जीभ, कठीण शस्त्रक्रिया यशस्वी

Subscribe

ग्लॉसेक्टॉमी एक सर्जिकल प्रक्रिया आहे. जीभेचा कर्करोग वाढल्यास ही शस्त्रक्रिया करून जीभ काढून त्याजागी नवीन जीभ तयार केली जाते. यामुळे रुग्णाला अन्न गिळता येऊ शकतं. याशिवाय बोलतानाही त्यांना अचडणी येत नाहीत.

पुणे – तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जीभेच्या कॅन्सरचं (Tongue Cancer) प्रमाण वाढत आहेत. अशात जीभेचा कॅन्सर झालेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. ही नवीन जीभ या व्यक्तीच्या छातीच्या स्नायूपासून तयार करण्यात आली आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

सुधीर कांबळे हा रुग्ण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राहणारा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जीभेला जखम झाली होती. जखम लहान असल्याने रुग्णाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु हळुहळु ही जखम वाढत गेल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवले. मात्र, काहीही फरक पडला नाही. तोंडातील व्रण आणि जखम वाढल्याने त्यांना तोंड उघडता येत नव्हतं. खातानाही त्यांना त्रास जाणवत होता. अशा स्थितीत एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून कुटुंबियांनी त्यांना पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयात नेण्यात आले. बायोप्सी चाचणीत (Biopsy Test) रुग्णाला जीभेचा कर्करोग असल्याचे निदान झालं. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे टोटल ग्लॉसेक्टॉमी (Total Glossectomy) शस्त्रक्रिया करून रुग्णाची जीभ काढून टाकली आणि नवीन जीभ तयार केली.

- Advertisement -

हेही वाचा थंडीची चाहूल! कोरड्या हवामानामुळे राज्यात पुढील चार दिवस गारठ्याचे

रुग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान म्हणाले की, तोंडात जखम झाल्याने रुग्ण उपचारासाठी आला होता. अशा स्थितीत तोंडात झालेल्या जखमेचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी बायोप्सी चाचणी केली. या चाचणी अहवालात रुग्णाला जीभेचा कर्करोग असल्याचं निदान झालं. हा कर्करोग जीभेच्या उजव्या बाजूला सुरू होऊन डाव्याबाजूला पसरला होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करून जीभ काढून टाकणे हा एकमेव पर्याय होता. त्यानुसार नातेवाईकांची परवानगी घेऊन टोटल ग्लॉसेक्टॉमी शस्त्रक्रियेद्वारे ही जीभ काढून टाकण्यात आली. याशिवाय मानेतही कर्करोगाच्या गाठीही काढून टाकण्यात आल्या. ग्लॉसेक्टॉमी एक सर्जिकल प्रक्रिया आहे. जीभेचा कर्करोग वाढल्यास ही शस्त्रक्रिया करून जीभ काढून त्याजागी नवीन जीभ तयार केली जाते. यामुळे रुग्णाला अन्न गिळता येऊ शकतं. याशिवाय बोलतानाही त्यांना अचडणी येत नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा – इंद्रायणीचा हंगाम सुरू; सुवासिक, चविष्ट तांदळाला खवय्यांची पसंती

कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. कमलेश बोकली म्हणाले की, तोंडाच्या कर्करोगाची समस्या सर्वात मोठी आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाच्या खास करून जिभेच्या कर्करोगाचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. ३० ते ५० वयोगटातील पुरूषांमध्ये जिभेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. लोकांनी सिगारेट, गुटखा, मावा व इतर तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहिल्यास तोंडाचा व जिभेचा कॅन्सर टाळता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -