घरमहाराष्ट्रजपून! पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांना 'अनोखी' शिक्षा

जपून! पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांना ‘अनोखी’ शिक्षा

Subscribe

'स्वच्छतेबाबत जनजागृती करणं आणि लोकांना स्वयंशिस्तीचे धडे देणं', हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं बिबवेवाडी प्रभाग अधिकारी अविनाश सकपाळ यांनी सांगितलं.

पुणे शहरात रस्त्यातून चालत असताना किंवा गाडीतून अथवा दुचाकीवरुन जात असताना थुंकणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकण्याची तलफ असणाऱ्यांना सध्या पुण्यात चांगलाच जरब बसतो आहे. रस्त्यात थुंकणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करणारे अधिकारी या लोकांना एक आगळीवेगळी शिक्षादेखील देत आहेत. त्यामुळे १०० रुपये दंड भरण्यासोबतच ही शिक्षा पूर्ण करणं थुंकणाऱ्या लोकांना अनिवार्य ठरत आहे. ही शिक्षा म्हणजे जे लोक थुंकताना दिसतील त्यांना तिथल्या तिथे कपडा आणि पाणी देऊन त्यांची थुंकी साफ करावी लागते आहे. त्यामुळे आता पुण्यात थुंकणं लोकांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. ‘पुण्यात थुंकण्यापूर्वी आता हजारवेळा विचार करा’ अशी प्रतिक्रियाही काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. यापूर्वी पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांना १०० रुपयांचा दंड आकारला जात जायचा. मात्र, आता त्यासोबतच थुंकणाऱ्याला त्याचीच थुंकी स्वच्छ करण्याची शिक्षाही दिली जात आहे.


वाचा: डोक्यात पाटा घालून पत्नीची हत्या; पतीला अटक

‘स्वच्छतेबाबत जनजागृती करणं आणि लोकांना स्वयंशिस्तीचे धडे देणं’, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं बिबवेवाडी प्रभाग अधिकारी अविनाश सकपाळ यांनी सांगितलं. दरम्यान, ही संपूर्ण प्रभागात ही मोहीम अशीच कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याचंही सकपाळ यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी घाणं करणं, थुकणं, कचरा टाकणं तसंच लघवी किंवा शौच करणं कायद्याने गुन्हा आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभिनयानांतर्गत याबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचं कुठलंही काम करणाऱ्यांकडून दंड वसून केला जावा तसंच त्यांच्यावर कारवाई केली जावी असे आदेश, केंद्र सरकारने प्रत्येक महापालिकेला दिले आहेत. या आदेशांनुसार महापालिका आपल्या पिरक्षेत्रात योग्य ती कारवाई करु शकतात.


पाहा: कंगना रनौतच्या ‘पंगा’ सिनेमाचं शूटिंग सुरु…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -