घरमहाराष्ट्रगुरू नानक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिखांच्या पारंपरिक वेषात राहुल गांधी सहभागी

गुरू नानक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिखांच्या पारंपरिक वेषात राहुल गांधी सहभागी

Subscribe

मुंबई : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात पोहोचली आहे. राहुल गांधी काल महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात पोहोचले. जिथे गुरू नानक जयंतीनिमित्त रात्रभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी शिखांच्या पारंपरिक वेषात दिसले.

गुरु नानक देव यांची आज जयंती आहे. गुरुनानक हे शिखांचे पहिले गुरू आणि शीख धर्माचे संस्थापक आहेत. गुरु नानक जयंतीचा दिवस शीख धर्मियांसाठी खूप खास असतो. त्यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतले. गुरु नानक देव जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी हे यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंहजी फतेहसिंहजी गुरुद्वारामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गुरू नानक देव यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली.

- Advertisement -

शिखांचे पहिले गुरू गुरु नानक यांचा जन्म 1469मध्ये पंजाब प्रांतातील तलवंडी येथे झाला. जे आता पाकिस्तानात आहे. हे ठिकाण नानकाना साहिब म्हणून ओळखले जाते. गुरु नानक जयंती गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. शीख धर्मातील हा सर्वात महत्वाचा सण आहे.

देगलूरमध्ये उत्साह, गर्दी आणि तिरंगामय वातावरण
राहुल गांधी यांच्या “नफरत छोडो भारत जोडो”चा संदेश देणारी ही पदयात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात सोमवारी रात्री दाखल झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षाच्या निशाणीसह फडकणारे तिरंगी झेंडे, तिरंगी पताका आणि तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई, असे देगलूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वातावरण तिरंगामय झाले होते. लहान मुले, महिला, तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला प्रचंड गर्दी झाली होती… पदयात्रेच्या मार्गावर उत्साह ओसंडून वाहत होता… सर्वांच्या नजरा राहुल गांधींकडे लागल्या होत्या… पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.
पदयात्रेच्या मार्गात प्रत्येक चौकाचौकात, प्रत्येक कॉर्नरला राहुलजी गांधी यांच्या स्वागताचे बॅनर, कटाऊट्स होते. त्यावर कॉग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमा झळकत होत्या.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -