राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मुक्काम महाराष्ट्रात वाढला, नेमकं काय आहे कारण?

rahul gandhi filed reply in breach of privilege case accusing pm modi of making unparliamentary remarks

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस आहे. आज ही यात्रा जळगाव जामोदवरून मध्यप्रदेशात मुक्कामी जाणार होती, मात्र आज यात्रेचा मुक्काम बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या निमखेडी या गावातच असणार आहे. दोन दिवस राहुल गांधी यांचे मिशन गुजरात सुरु राहील. त्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा दाखल होतील.

उद्या सकाळी राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या हेलिपॅडची उभारणी सुद्धा निमखेडी येथे करण्यात आली आहे. 22 नोव्हेंबरला राहुल गांधी परतल्यानंतर यात्रा नियोजित मार्गाने मार्गस्थ होणार आहे. 22  नोव्हेंबरला गुजरातमधील सभा आटोपून ते पुन्हा निमखेडी येथील परत येतील. 14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली ही यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार होती. परंतु यात्रेचा मुक्काम वाढला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 182 जागांपैकी 89 जागांवर मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळं राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून दोन दिवसांचा वेळ गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी देणार आहेत.


हेही वाचा : त्रिवेदींचं वक्तव्य दुदैवी, महाराजांना यामध्ये का ओढता; संभाजीराजे छत्रपतींचा सवाल