घरताज्या घडामोडीमुंबईकर छत्री घरीच ठेवा... पाऊस चार दिवस सुट्टीवर

मुंबईकर छत्री घरीच ठेवा… पाऊस चार दिवस सुट्टीवर

Subscribe

मुंबईत पावसाने ब्रेक घेतल्याने कधी ढगाळ तर कधी चांगल्या सुर्यप्रकाशाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. कोकणात येत्या काही दिवसांमध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत पाऊस ब्रेक घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामानिमित्ताने तसेच नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी येते काही दिवस छत्री न घेताही प्रवास करता येईल. मुंबईसह कोकणात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान राज्याच्या आतील भागामध्ये पावसामध्ये वाढ होण्याचा एलर्ट देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रविवारपासून मुंबईसह कोकण परिसरात पावसाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे तर कधी पडणाऱ्या लख्ख ऊनामुळे मुंबईकरांची चांगलीच दमछाक होत आहे. वातावरणातले आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने अस्वस्थ वाटत असतानाच दुसरीकडे मात्र घामाच्या धारा लागल्याचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. मुंबईसह कोकणात पाऊस ब्रेक घेणार असला तरीही दुसरीकडे मात्र राज्याच्या इतरत्र भागात मात्र पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने मांडलेला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. सध्या या भागात पावसाचे वातावरण सॅटेलाईटच्या इमेजमधून पहायला मिळत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -