घरताज्या घडामोडीनिवडणुका पुढे ढकलण्याचा डाव, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Subscribe

राज्य सरकारलाच महापालिका निवडणूका घ्यायची इच्छा नाही

महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे ( MNS) जोरदार तयारीला लागली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या (Pune) सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी (OBC Reservationz0 सर्व पक्षाचे एकमत झाले त्यावर राज ठाकरे म्हणाले, स्थगितीचे काम लवकर पूर्ण होणार असेल तर स्थिगीत योग्य आहे. निवडणूका आता नकोत हे सरकारच्या फायद्याचे असेल तर त्यात काही तरी काळबेर असेल ते आपल्याला समजून घ्यायला हव. ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट असू शकतो,असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -

सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकार बघणार. हे असे उद्योगधंदे सरकारचे चालू आहे. ओबीसींच्या विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारलाच महापालिका निवडणूका घ्यायची इच्छा नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणूका लांबणीवर घालण्याचा डाव आखला जातोय असा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. प्रशासक नेमून महापालिकांवर वचक ठेवण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे.

- Advertisement -

राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ८ विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष व वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. २ महिन्यात राज ठाकरे यांचा हा आठवा दौरा आहे.


हेही वाचा – ‘ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात’, पंडित नेहरुंचा फोटो वगळल्याने संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -