घरनवी मुंबईसहकार चळवळीवरून Raj Thackeray यांचा सत्ताधाऱ्यांना टोला, म्हणाले - "आता सुरू आहे..."

सहकार चळवळीवरून Raj Thackeray यांचा सत्ताधाऱ्यांना टोला, म्हणाले – “आता सुरू आहे…”

Subscribe

मनसेने आज सहकार निवासी मार्गदर्शन दोन दिवसीय शिबिराचे नेरळ येथे आयोजन केले आहे. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यातील सहकार चळवळीविषयी माहिती देत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

नवी मुंबई : मनसेने आज सहकार निवासी मार्गदर्शन दोन दिवसीय शिबिराचे नेरळ येथे आयोजन केले आहे. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यातील सहकार चळवळीविषयी माहिती देत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सध्याचे सरकार हे सहकार चळवळ नसून ती ‘सहारा’ चळवळ आहे, म्हणजेच आम्ही अडकलो आहोत, आम्हाला वाचवा असा त्याचा अर्थ होतो, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. तर, त्यांना महानंद डेअरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर देखील आपले मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रामधील महानंद डेअरी भविष्यात अमुल गिळंकृत करते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

हेही वाचा… Thackeray faction : गुजरातची चमचेगिरी मराठी माणसाच्या मुळावर, राज्य सरकारवर घणाघात

- Advertisement -

मनसे सहकार शिबिराच्या उद्घाटनात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माणसाला धंदा जमत नाही असे बोलतात पण असंख्य मराठी माणसे करोडोंचे व्यवसाय करतात पण गप्प असतात. शोबाजी करत नाही. जगातील प्रसिद्ध परफ्यूमचा अर्क हे ठाण्यातील केळकर बनवतात. आपली ताकद खुप मोठी आहे. राज्यात सहकार चळवळ उभी राहिली आहे. आताचे सरकार ही सहकार चळवळ नाही ती सहारा चळवळ आहे. महात्मा जोतीबा फुले यांनी सहकार चळवळ उभी केली. जमिनी श्रीमंताच्या घशात जावू नयेत म्हणून जोतीबांनी पहिले आंदोलन केले, अशी माहिती राज ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आली. तर, आज महाराष्ट्रात जवळपास 2 लाख 22 हजार सहकारी संस्था आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संस्था देशात कोणत्याच राज्यात नाही, त्यानंतर त्या गुजरातमध्ये आहेत, असे म्हणत त्यांनी महानंद डेअरीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली.

महानंद दुध डेअरी प्रकल्पाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, , गुजरातचा महाराष्ट्रवर डोळा आहे. आपली महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते का असा प्रश्न उभा आहे. सहकर चळवळ सांभाळायला अनेक ग्रेट माणसे आहेत. इतिहासाकडून शिकले पाहिजे. वर्तमान हातून निघून जाईल. मराठवाड्यात विहिरीला 800-900 फूट पाणी नाही. साखर कारखाने उभा करून ऊस लागवड होते, पाणी जास्त लागते. पाणी खेचल्यास मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार असे तज्ञ सांगत आहेत पण आम्हाला फरक पडत नाही . जमीन बरबाद होत आहे. वाळवंट झाल्यास ती जमीन पूर्ववत करायला 400 वर्ष लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -