घरक्राइमSharad Mohol Murder Case : दोन वकिलांसह आठ आरोपींना अटक

Sharad Mohol Murder Case : दोन वकिलांसह आठ आरोपींना अटक

Subscribe

पुणे : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता पुसली जात असल्याचे चित्र आहे. कारण, पुण्यात मागील अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. शुक्रवारी (5 जानेवारी) पुण्याच्या कोथरूडममधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी रात्री उशीरा आठ जणांना अटक केली होती. यानंतर आता शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वकिलांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. (Sharad Mohol Murder Case Eight accused including two lawyers arrested)

हेही वाचा – Thackeray faction : गुजरातची चमचेगिरी मराठी माणसाच्या मुळावर, राज्य सरकारवर घणाघात

- Advertisement -

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबार केलेल्या चारपैकी एक गोळी शरद मोहोळ यास लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासात शरद मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला.

गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री खेड शिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल पोळेकरसह आठ जणांना अटक आली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, मोटार जप्त करण्यात आली. साहिल उर्फ मोन्या पोळेकर याने जमीन खरेदी प्रकरणातील आर्थिक व्यवहारातून शरद मोहोळ याच्यावर बंदुकीतून गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यानंतर आता रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशा दोन वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात वकिली करतात. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना शरद मोहोळ खून प्रकरणातील अन्य आरोपींसोबत शुक्रवारी रात्री अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – भारताची सौर मोहीम आदित्य L-1 आज अंतिम टप्प्यात पोहोचणार, ISRO ने दिली महत्त्वाची माहिती

शरद मोहोळवर खून, अपहरणासारखे अनेक गुन्हे दाखल

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अपहरण, खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि खुनासारखे गुन्हे मोहोळच्या विरोधात दाखल आहेत. पिंटू मारणे खून प्रकरणात शरद मोहोळला अटक झाली होती. याशिवाय त्याने येरवडा कारागृहात सिद्दीकी नामक इसमाचा खून केला होता. मात्र पुराअभावी त्याची मुक्तता झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -