घरमहाराष्ट्रराज ठाकरेंनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

राज ठाकरेंनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

Subscribe

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे येत्या २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरे यांनी सप्तशृंगी देवीच्या चरणी ठेवली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. सप्तशृंगगडावर सकाळी अकरा वाजता राज ठाकरे यांचे आगमन झाले असता ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आताषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. मनसे कार्यकर्तेच्या उपस्थितीत मोठ्या उस्फूर्तात राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी नृत्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी मनसे नेते बाळा नादंगावकर, मनसेचे माजी महापौर तसेच प्रदेश सरचिटणीस आशोक मूर्तडक यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – माझी पोतडी निवडणुकीच्या वेळी उघडेन – राज ठाकरे


अमितची लग्न पत्रिका देवी चरणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे येत्या २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरे यांनी सप्तशृंगी देवीच्या चरणी ठेवली. लग्नपत्रिका देवीच्या चरणी ठेऊन देवाला आमंत्रण दिल्यानंतर लग्नपत्रिका वाटण्याची परंपरा आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड येथे सप्तशृंगी देवीच्या चरणी पत्रिका ठेवली.

- Advertisement -

हेही वाचा – पाहा काय सांगितलं या शेतकऱ्यानं राज ठाकरेंना!


व्यापारी आणि ग्रामस्थांनी मांडल्या समस्या

राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्याचा आजचा चौथा दिवस आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन खाली आल्यानतंर सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ आणि व्यापारी तसेच मनसे कार्यकर्ते यांनी शाल आणि श्रीफळ देऊन राज ठाकरे यांचा सत्कार केला. सप्तश्रृंगी येथील व्यवसायिकांनी विविध समस्या आणि व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी आणि ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -