पूजा चव्हाण प्रकरणातील 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे, राजेंद्र गायकवाडांचा गौप्यस्फोट

Rajendra Gaikwad has revealed that he has a 56-minute CD of the Pooja Chavan case

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 40 आमदार आहेत. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. आता शिवसैनिकांनीच संजय राठोड यांच्याविरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदसोडावे लागले होते. अलीकडेच संजय राठोडांची मंत्रिमंडळात घरवापसी होणार अशी चर्चा सुरू होती. पण एकनाथ शिंदेंनी गड पुकारल्यामुळे संजय राठोड गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक संपाले असून त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे.

56 मिनिटांची सीडी –

यवतमाळ जिल्ह्यातील आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले पुरावे समोर आणू. या प्रकरणातील 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही –

पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीला मारून संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली, पूजा चव्हाण वर त्याने कसे अत्याचार केले हे आम्हाला माहिती असून त्याचा पर्दाफाश करू असेही गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितलं. राठोड विरुद्ध गळा काढणारे भाजप नेते आणि चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला. संजय राठोड यांनी गुवाहाटीतून मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.