घरताज्या घडामोडीCorona Virus : राज्यात १०० टक्के लॉकडाऊनची सध्या आवश्यकता नाही, राजेश टोपेंची...

Corona Virus : राज्यात १०० टक्के लॉकडाऊनची सध्या आवश्यकता नाही, राजेश टोपेंची माहिती

Subscribe

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जे गृह विलीगीकरणात आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ७ दिवसांचे क्वारंटाईन असणार आहेत. आरटीपीसीआर रिपोर्ट नकारात्मक येणं गरजेचे आहे अन्यथा क्वारंटाईन लांबणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढतो आहे. मागील ७२ तासांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु राज्यामध्ये १०० टक्के लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही आहे. टास्क फोर्स आणि उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांसह कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांच्या संख्या वाढवण्यात आल्या आहेत. परंतु कोरोना लसीकरणामुळे रुग्णांना अधिक धोका उद्भवत नाही हे दिलासादायक असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपेंनी सांगितले की, कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आज २५ हजार होण्याची शक्यता आहे. जो आकडा येतो आहे त्याच्या दुप्पट कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. जमेची बाजू आहे की, संख्या वाढत आहे. पण ९० टक्के रुग्ण लक्षणेविरहित आहेत. रुग्णालयातील रुग्णांची संख्या १ ते २ टक्क्यावर आहे. कोरोना लसीकरण मोठ्या संख्येने झाल्यामुळे कोरोनाची तीव्रता अजिबात नाही. लसीकरण हा फार महत्त्वाचा विषय आहे. यामुळे लसीकरणावर भर दिला जात असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

- Advertisement -

लसीकरणावर भर

आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत. शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी असा निर्णय झाला आहे. खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्याच रुग्णालयात बुस्टर डोस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाबाबत पुन्हा जनजागृती करणार

आयईसी म्हणजे कोरोनाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येकाला कोरोना लक्षणांची माहिती देण्यात येईल. त्या व्यक्तीला समजले पाहिजे की कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्याबाबत त्याला सांगण्यात येणार आहे. लक्षणे दिसल्यावर चाचणी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. दोन दिवसांत जनजागृती करण्यात येणार आहे. होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईन करत असताना फोनवरुन कशाप्रकारे सल्ला दिला जाईल हे देखील ठरवण्यात आले आहे.

- Advertisement -

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जे गृह विलीगीकरणात आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ७ दिवसांचे क्वारंटाईन असणार आहेत. आरटीपीसीआर रिपोर्ट नकारात्मक येणं गरजेचे आहे अन्यथा क्वारंटाईन लांबणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

चौकाचौकात कोरोना चाचणी करणार

प्रत्येकाचे आरटीपीसीआर करणं हे फार तणावात्मक आहे. त्यामुळे आपल्याकडे जी क्षमता आहे त्यानुसार टेस्ट करण्यात येईल. परंतु त्याने पुरेसे होणार नाही यासाठी अँटीजेन टेस्टवर भर देण्यात येणार आहे. अँटीजेनवर पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा आरटीपीसीआर करु नये असे ठरलं आहे. आरटीपीसीआर किंवा किऑस्कवर टेस्ट करण्यात येणार आहे. राज्यात चौका-चौकात किऑस्क आणि अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. मेडिकलमधून जर कोणी कोरोना चाचणी किट खरेदी केले तर त्याचा अहवाल दररोज द्यावा लागणार आहे.

१०० टक्के लॉकडाऊनची आवश्यकता नाही

कोविट टास्क फोर्सने ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन असा शब्द वापरला आहे. अशी संख्या वाढत गेली तर ल़ॉकडाऊन करण्यात येणार नाही. १०० टक्के लॉकडाऊन करण्याची सध्यातरी आवश्यकता नाही. ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येईल. ज्याची आता गरज नाही त्या थांबवता येतील का याबाबत विचार आहे. गर्दी रोखण्यासाठी निर्बंध आणावे लागणार आहेत. लगेच निर्बंध लावण्यात येणार नाहीत परंतु आढावा घेऊन ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधांबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : corona virus : महाराष्ट्रातील 13 मंत्र्यांसह 25 बडे नेते कोरोनाच्या विळख्यात, 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -