घरCORONA UPDATECoronaVirus: आपण अजून स्टेज थ्रीमध्ये नाही - आरोग्यमंत्री

CoronaVirus: आपण अजून स्टेज थ्रीमध्ये नाही – आरोग्यमंत्री

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११३५वर पोहोचली असताना आणि देशभरात हा आकडा ५ हजारांच्याही वर गेलेला असताना राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी मात्र राज्यातल्या जनतेला दिलासादायक माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्रात अजूनही कोरोनाच्या स्टेज थ्रीची परिस्थिती आलेली नाही. यासंदर्भात आयएमसीआर आणि जागतिक आरोग्य संघटनेला रिअल टाईम माहिती मिळत असते. त्यानुसार त्यांचं देखील प्रत्येक राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष असतं. त्यामुळे यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना जाहीर करेलच. मात्र, महाराष्ट्रात तरी अद्याप स्टेज थ्रीसारखी परिस्थिती नाही’, असं राजेश टोपे म्हणाले. आज संध्याकाळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

धारावी बंद करण्याची परिस्थिती नाही

दरम्यान, मुंबईच्या धारावीमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळल्यामुळे धारावी बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आरोग्यमंत्र्यांनी त्याला नकार दिला. ‘मुंबईत धारावीमध्ये मी जाऊन आलो. दाटीवाटीची वस्ती आहे. तिथे एकूण १० रुग्ण आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशींना तिथले प्रश्न समजावून सांगितले आहेत. तिथले पब्लिक टॉयलेट, फायर ब्रिगेडची गाडी या गोष्टींवर तातडीने पावलं उचलण्यात आली आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने संसर्ग होण्याची शक्यता असते. पण धारावी बंद करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन देखील योग्य ती खबरदारी घेत आहे. फक्त लॉकडाऊन धारावीत प्रभावीपणे राबवण्यावर आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत’, असं राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

मुंबई-पुण्यात मास्क सक्ती

‘मुंबई-पुण्यात जिथे संख्या जास्त आहे, तिथे सक्तीने मास्क घालावा लागेल. मुंबई पालिकेने ज्याप्रमाणे १८९७च्या साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून मास्क नसलेल्यांना दंड करण्याचं ठरवलं आहे. हेच अधिकार राज्यातल्या सर्व महापालिकांना देण्यात आले आहेत. श्वसनाच्या माध्यमातून काही प्रमाणात कोरोना पसरल्याच्या काही केस स्टडीज दिसून आल्या आहेत’, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल

कोरोनाचा संभाव्य फैलाव लक्षात घेता आता प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयएमएनं दिल्याचं राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं. या रुग्णालयांमध्ये तपासणी आणि चौकशी होईल. प्रायव्हेट हॉस्पिटलची सेवा देखील सुरू करण्यात येईल. मोबाईल क्लिनिक देखील आयएमएच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत, असं टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -