घरमहाराष्ट्रउद्धवजींच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे, रामदास कदम कडाडले; म्हणाले, बाप दाखवा...,

उद्धवजींच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे, रामदास कदम कडाडले; म्हणाले, बाप दाखवा…,

Subscribe

Ramdas Kadam Counter Attack on Uddhav Thackeray | मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये जाहीर सभेत शिंदे गटातील आमदार, भाजपा आणि निवडणूक आयोगावर चौफेर प्रहार केले. यावेळी स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावरही टीकास्त्र डागलं. तर, रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला. ठाकरेंच्या टोलेबाजीमुळे संतापलेल्या रामदास कदमांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंना कडव्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा दिसत असला तरीही त्यामागे अनेक चेहरे आहेत हे आम्ही पाहिलंय, असं रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा – शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांची निवडणूक आयोगाचा फैसला मान्य नाही-उद्धव ठाकरे

- Advertisement -

खेडमध्ये विराट सभा झाल्याने कोकणवासियांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. परंतु, तुम्ही १०० वेळा खेडमध्ये आलात तरीही तुम्ही योगेश कदमला संपवू शकत नाहीत, असा इशारा रामदास कदमांनी दिला. खेडचा विकास मी केला आहे. माझा मुलगा आमदार योगेश कमदने केलाय, हे ठाकरेंना माहितेय. त्यामुळे योगेश कमदला कोणी हरवू शकत नाही. काल विराट सभा झाली असं तुम्ही म्हणालात, पण कालच्या सभेत खेडची किती लोक होते? मुंबई आणि ठाण्यातून लोकं आणले होते. काही लोक भाषणदरम्यान सोडून जात होते, असं रामदास कदम म्हणाले.

आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला जातो. पण एकतरी आमदार दाखवा ज्याने पैसे घेतले आहेत. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. पण शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिले असते का असा प्रश्न कोणत्याही शेंबड्या मुलाला जाऊन विचारा. तो नाही असंच उत्तर देईल. बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य कार्यकर्त्याला असामान्य केलं. पण, येथे बाप मुख्यमंत्री आणि बेटा कॅबिनेट मंत्री बाकी नेते आऊट अशी परिस्थिती आहे, असाही पलटवार रामदास कदमांनी केला.

- Advertisement -

हो शिंदे खोके देतात

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत खोके घेऊन बंडखोरी केला असल्याचा दावा केला जातोय. यावर रामदाक कदम यांनी रोखठोक वक्तव्य केलं आहे. हो, एकनाथ शिंदेंकडून खोके मिळताच. विकासासाठी खोके मिळतात. महाविकास आघाडीच्या काळात अजित दादांनी शिवसेनेच्या आमदारांना किती पैसे दिले? राष्ट्रवादीने स्वतःला ५७ टक्के निधी घेतला, काँग्रेसच्या आमदारांनाही पैसा दिला. पण शिवसेनेच्या आमदारांना पैसे दिले नाहीत, असा आरोपही रामदास कदमांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -