घरताज्या घडामोडीरामदेव बाबांचे ते वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे : डॉ. नीलम गोऱ्हे

रामदेव बाबांचे ते वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे : डॉ. नीलम गोऱ्हे

Subscribe

रामदेवबाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महिला वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. रामदेव बाबांचे ते वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे होते, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी निषेध केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रामदेवबाबांच्या फोटोला जोड्याने हाणले.

मुंबई : रामदेवबाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महिला वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. रामदेव बाबांचे ते वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे होते, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी निषेध केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रामदेवबाबांच्या फोटोला जोड्याने हाणले. महिलांनी कपडे घातले नाही तरी त्या जास्त सुंदर दिसतात,असे वादग्रस्त वक्तव्य रामदेवबाबा यांनी शुक्रवारी ठाण्यात केले होते. डॉ. गोऱ्हे यांनी रामदेवबाबांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करते. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीसांनी निषेध करायला हवा

आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते. असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

- Advertisement -

योगासारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबींसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता त्यांच्या या विधानाने लांच्छनास्पद होईल. त्यांचे विधान म्हणजे रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रवादीचे आंदोलन

दरम्यान, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज रामदेवबाबांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली रामदेव बाबांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.


हेही वाचा – जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -