घरमहाराष्ट्रराणे रविवारी भाजपमध्ये जाणार

राणे रविवारी भाजपमध्ये जाणार

Subscribe

स्वाभिमानही विलीन करणार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे हे गणेशाच्या आगमनापूर्वी म्हणजे १ सप्टेंबर रोजी आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करणार आहेत. तसेच स्वत: राणे आणि त्यांचे पुत्र नितेश आणि निलेश हेही भाजपत प्रवेश करणार आहेत. तसे स्पष्ट संकेत नारायण राणे यांनी गुरुवारी येथे दिले.

बेस्ट संयुक्त कृती समितीने वडाळा डेपो येथे आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले आहे. उपोषण करणारे कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावली. ते कळताच राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. आपण येत्या १ सप्टेंबर रोजी भाजपत प्रवेश करणार असल्याची दिवसभर चर्चा आहे. ती खरी आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राणे म्हणाले की, तुम्ही म्हणताय ते खरे आहे.

- Advertisement -

राणे येत्या रविवारी म्हणजे १ स्पटेंबर रोजी आपला पक्ष भाजपत विलिन करणार आहेत. तसेच ते आपले दोन्ही पुत्र नितेश, निलेश यांच्यासोबत भाजपत प्रवेश करणार आहेत.

राणेंची बेस्ट मध्यस्थी

बेस्ट संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिला आहे. कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावल्याचे कळताच नारायण राणे यांनी आझाद मैदानावर जावून उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. बेस्ट उपक्रमाशी

- Advertisement -

माझे जुने संबंध आहेत. कामगारांबद्दल आस्था म्हणून मी या सर्वांना इथे भेटायला आलो. सर्वांनी गौरी-गणपतीपर्यंत आंदोलन मागे घेतलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,असे राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

बेस्ट कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बेस्ट संयुक्त कृती समितीने वडाळा बस आगारात बेमुदत उपोषण पुकारले होते. मात्र, गुरुवारी उपोषण करणारे कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना त्वरीत केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष,खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी रात्री याठिकाणी भेट देवून उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

सध्या बेस्टचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यांच्या मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचार्‍यांना माझा पाठिंबा आहे. मी कुणाच्याही नोकरीवर गदा येऊ देणार नाही. मुंबईत बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही. मी विनंती करतो की, कर्मचार्‍यांनी उपोषण आजच सोडावे. न्याय मिळाला नाहीतर गणपतीनंतर मी तुमच्या आंदोलनात स्वतः सहभागी होईन. गौरी-गणपतीनंतर पूर्णपणे आंदोलनासाठी सज्ज होऊ, असे आश्वासन नारायण राणे यांनी यावेळी दिले. त्यानंतर कामगारांनी राणे यांच्या विनंतीचा मान राखत उपोषण मागे घेण्याचे मान्य केले. त्यानंतर राणे यांनी सर्वांना फळाचा रस पाजून हे आंदोलन तुर्तास स्थगित केले.

या आंदोलनानंतर पत्रकाराशीं बोलतांना नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली. सत्तेत राहूनही बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. वेतन करार हा ‘मातोश्री’वर होत नाही. तो बेस्ट उपक्रमात होतो. कामगारांना विश्वासात घेऊन चर्चा होते,असे सांगत राणे यांनी कामगारांवर कुठलीही मेहरबानी केली जात नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. वेतन करारासाठी अभ्यास पाहिजे. मागच्या वेतनश्रेणीचा अभ्यास करावा लागतो. ’मातोश्री’ला ते कळणार नाही.कामगारांच्या मागण्या आधी कळल्या पाहिजेत. आज शिवसेनेत असे कोण आहे, ज्याला त्याचा अभ्यास आहे, असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले.

रविवारी राणे भाजपत
येत्या १ सप्टेंबर रोजी आपण भाजप प्रवेश करणार आहात अशी दिवसभर चर्चा आहे, ती खरी आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ते खरे आहे, असे उत्तर नारायण राणे यांनी दिले. त्यामुळे रविवारी, १ सप्टेंबर रोजी नारायण राणे आपला स्वाभिमान पक्ष भाजपत विलिन करणार असून आपल्या मुलांसह भाजपत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -