Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीRamtek : रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र रद्द तर, उमेदवारी अर्जही बाद; आता काँग्रेस...

Ramtek : रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र रद्द तर, उमेदवारी अर्जही बाद; आता काँग्रेस काय करणार?

Subscribe

देशातील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (28 मार्च) सकाळी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्यांचा अर्जच बाद करण्यात आला.

नागपूर : देशातील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (28 मार्च) सकाळी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्यांचा अर्जच बाद करण्यात आला. रामटेक मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली होती, पण आता त्यांचा अर्ज बाद केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मात्र, एकीकडे काँग्रेसला धक्का बसला असला तरी, दुसरीकडे त्यांना दिलासाही मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे यांनी डमी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता तेच रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. (rashmi barve candidate of congress application cancelled by election commission ramtek lok sabha election)

केंद्रीय निवडणूक आयोगाने रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे कारण त्यांचा अर्ज बाद केला. रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र तयार करताना खोटी कागदपत्रं जोडली, त्यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कसे खोटे आहे हे महायुतीच्या नेत्यांनी वकिलामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पटवून दिले होते. महायुतीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अर्जाची छानणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर आता त्यांची उमेदवारीही रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

- Advertisement -

मात्र, रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वे यांनी डमी अर्ज भरला असून त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळे आता आता तेच काँग्रेसचे उमेदवार राहण्याची शक्यता असून, काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या किशोर गजबियेंनी आपण प्रशासकीय अधिकारी असल्याने रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र बाद ठरणार असल्याचा इशारा काँग्रेसला दिला होता. तसेच, किशोर गजभियेंनी वंचित आघाडीची साथ घेत रामटेकमधून उमेदवारी अर्जही दाखल केला.

- Advertisement -

हेही वाचा – CS KARIR : मुख्य सचिव नितीन करीर यांना तीन महिने मुदतवाढ; यामुळे सौनिक, राजेशकुमार, चहल यांचा पत्ता कट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -