घरताज्या घडामोडीधक्कादायक! बेपत्ता असलेल्या पत्नीची पतीकडूनच हत्या

धक्कादायक! बेपत्ता असलेल्या पत्नीची पतीकडूनच हत्या

Subscribe

बेपत्ता असलेल्या पत्नीची पतीकडूनच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या बेपत्ता होत्या. मात्र, स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनी अटक केली असून यामध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे.

पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वप्नाली सावंत यांच्याविरोधात १ सप्टेंबर रोजी हत्येचा कट रचण्यात आला होता. यावेळी या तिघांनी कट रचून स्वप्नाली यांना जाळून त्यांची हत्या केली. या प्रकरणात शहर पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. तसेच एकमेकांचे फार पटत नव्हते, असं सांगण्यात येत आहे. परंतु या हत्येमागचं नेमकं कारण काय?, हे अद्याप समजू शकलेले नाही. रत्नागिरी शहर पोलिसांकडून मागील ८ दिवसांपासून तपास केला जात होता. आरोपींनी स्वप्नालीची जाळून हत्या केल्यानंतर तिची राख समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा पुरावा हाती लागत नव्हता. परंतु रत्नागिरी शहर पोलिसांनी कौशल्य लगावल्यामुळे त्यांना शोधकार्य करण्यास यश मिळालं.


हेही वाचा : चीनबाबत पंतप्रधानांकडून दिशाभूल, शरद पवारांचा हल्लाबोल

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -