घरमुंबई'अशा' खासदारांना सगळ्यात आधी तुरुंगात डांबले पाहिजे, मनसे नेते अमेय खोपकरांचे ट्वीट

‘अशा’ खासदारांना सगळ्यात आधी तुरुंगात डांबले पाहिजे, मनसे नेते अमेय खोपकरांचे ट्वीट

Subscribe

मुंबई – गणेश विसर्जन मिरवणुकीतच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गाटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. या प्रकरणात पोलिसांच्या मध्यस्थीने संघर्ष टळला होता. मात्र, या वादाचे पडसाद पुन्हा उमटले. दरम्यान खासदार अरविंद सावंत आणि एका पोलिसामध्ये बाचाबाची झाली. त्यावरुन, मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन टीका केली आहे.

ट्विटमध्ये काय  –

- Advertisement -

स्वत:ची शून्य कामगिरी, पण कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी, असा नावाने हे ट्वीट करण्यात आले आहे. यात सणासुदीच्या या काळात कुठेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सतत दक्ष असणारे, पावसापाण्यात -उन्हातान्हात उभं राहून बाप्पाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी राबणारे पोलिस. पण काही राजकारण्यांमध्ये नसते धमक, मग ते कार्यकर्त्यांसमोर या पोलिसांना दमबाजी करतात. विसर्जन मिरवणुकीनंतर दमलेल्या या पोलिसांबरोबर हुज्जत घालायला, त्यांना धमकावायला अरविंद सावंतसारख्या बेशरम खासदाराला सगळ्यात आधी तुरूंगात डांबले पाहिजे. पोलिसांचा असा अपमान आम्ही कधीच सहन करु शकत नाही. अरविंद सावंत, नवनीत राणा सारख्यांना आम्ही कधीच जबाबदार राजकारणी म्हणूच शकत नाही. अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार असो, असे मनचिसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

दादरमध्ये दोन गटांतील राड्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले. पोलीस स्थानकांत दाखल होताच अरविंद सावंत आणि तेथील एका पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून आले. दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनीही पोलिसांना पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांसोबत वाद घातला होता. त्यानंतर,   खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात संबंधित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मनचिसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन दोन्ही नेत्यांचा धिक्कार करत टीका केली आहे.

काय घडले – 

 गणपती विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटात झालेला राडा  पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाच्या तक्रारीवरून शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात आले, तर उलट सदा सरवणकरांसह अनेकांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर नवनीत राणा यांच्या प्रकरणात शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचे अपहरण करून हे प्रकरण लव्ह जिहादचा असल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या प्रकरणातील तरुणी सातारा येथे सापडली होती. यानंतर नवनीत राणा यांच्याविरोधात संबंधित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणावर अमेय खोपकर यांनी ट्विट करून दोन्ही नेत्यांचा धिक्कार केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -