Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीवर रवींद्र धंगेकरांचा बहिष्कार; सांगितले कारण

चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीवर रवींद्र धंगेकरांचा बहिष्कार; सांगितले कारण

Subscribe

कसबा पेठ विधानसभेचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज (ता. २७ मार्च) पुणे शहरातील विविध प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली होती. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीच्या मध्येच रवींद्र धंगेकर बाहेर पडल्याने चर्चा रंगू लागल्या होत्या.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र धंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विविध प्रश्नांच्या बाबतची बैठक पार पडली. या बैठकीला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना सुद्धा बोलावण्यात आले होते. त्याप्रमाणे धंगेकर हे या बैठकीला हजर राहिले होते. पण बैठकीच्या मध्येच धंगेकर यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. धंगेकर यांनी बैठकीच्या मधूनच काढता पाय का घेतला? याबाबत विविध चर्चा होऊ लागल्या होत्या. पण धंगेकर यांच्याकडून याबाबतचे कारण सांगण्यात आले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “बैठक सुरू झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी माझ्याकडे पाहिलेच नाही. या बैठकीत पुण्यातील रस्ते आणि वाहतुकीबद्दल चर्चा सुरू होती. तेव्हा अचानक गणेश बिडकर तिथे आले. आजच्या बैठकीला त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र, त्यांना भाजपाचीच बैठक घ्यायची होती, तर नागरिकांमध्ये खुलेआम चर्चा करायला हवी होती.”

- Advertisement -

पुढे बोलताना ते म्हणाले की, “बैठकीसाठी 6 जण निमंत्रित होतो. ही चर्चा चालू असताना मध्येच बीडकर यांनी बोलण्यास सुरूवात केली. पालकमंत्र्यांना काही समजत नाही, त्यांनाच पुण्याचं समजतं, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. पालकमंत्र्यांपेक्षा तज्ञ्ज मंडळी आहेत. त्यामुळे आपण निघून आलेल महत्वाचं आहे,”

“पालकमंत्र्यांना अशीच बैठक घ्यायची होती, तर नागरिकांत घ्यायला पाहिजे. पुण्यात अनेक तज्ञ्ज मंडळी आहेत. बीडकर नगरसेवक नाहीत, कोणत्या पदावर नाहीत. तरीही अशा बैठकीला अशी लोक येत असतील, तर आम्ही आमदार होऊन का त्याठिकाणी बसायचं. म्हणून बैठकीतून बाहेर पडलो,” असे म्हणत आमदार रवींद्र धंगेकर यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे सर्व लोकांकडून कौतुक करण्यात आले. कसबा पेठेचा थांबलेला विकास आणि प्रलंबित प्रश्न आमदार रविंद्र धंगेकर यांच्यामुळे मार्गी लागतील, असा विश्वास मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार धंगेकर हे त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी देखील लागले आहेत.


हेही वाचा – मुंबईत जलवाहिनी फुटली, दोन दिवस १५ टक्के पाणीकपात

- Advertisment -