घरताज्या घडामोडीमुंबईत जलवाहिनी फुटली, दोन दिवस १५ टक्के पाणीकपात

मुंबईत जलवाहिनी फुटली, दोन दिवस १५ टक्के पाणीकपात

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई-२ जलवाहिनी मुलुंड जकात नाक्याजवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. आता या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जल अभियंता खात्याकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरांमध्ये २७ मार्च रात्री १० ते २९ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेपर्यंत १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी या कालावधीत आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पलिकेने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई-२’ जलवाहिनीस धक्का लागल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

- Advertisement -

पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जल अभियंता खात्याकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्ती काम सुरू असताना सदर कालावधीत म्हणजे २७ मार्च रोजी रात्री १० वाजेपासून २९ मार्च रात्री १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

पूर्व उपनगरे आणि शहर विभागामध्ये खालील भागात होणार पाणी कपात :

- Advertisement -

१) पूर्व उपनगरे :

‘टी’ विभाग : मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग

‘एस’ विभाग -: भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.

  • ‘एन’ विभाग -: विक्रोळी, घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग
  • एल विभाग -: कुर्ला (पूर्व) विभाग
  • एम/पूर्व विभाग -: मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी आदी संपूर्ण विभाग
  • एम/पश्चिम विभाग -: चेंबूर संपूर्ण विभाग

 २) शहर विभाग :

–  ‘ए’ विभाग -: कुलाबा, सीएसटी आदी विभाग

– ‘बी’ विभाग -: सॅन्डहर्स्ट रोड

– ई विभाग -: भायखळा

– ‘एफ/दक्षिण’ विभाग -: परळ संपूर्ण विभाग

– एफ/उत्तर विभाग -: माटुंगा, वडाळा आदी संपूर्ण विभाग


हेही वाचा : आम आदमी पार्टीत फूट; ‘मराठी’ नेत्यांची गळचेपी; मुंबई अध्यक्ष प्रिती मेनन यांना हटविण्याची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -