घरमहाराष्ट्रसिद्धीविनायकानंतर कर्नाटकचे बंडखोर आमदार साईंच्या चरणी!

सिद्धीविनायकानंतर कर्नाटकचे बंडखोर आमदार साईंच्या चरणी!

Subscribe

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदारांनी आज शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईदर्शन घेतले.

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदारांनी आज, शनिवारी शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईदर्शन घेतले. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चार्टर विमानाने त्यांचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. खासगी बसने आमदारांना घेऊन शिर्डीत दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी या बंडखोर आमदारांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने या आमदारांना काँग्रेस पक्षाचे झेंडे दाखवण्यात आले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तर भाजपचा निषेध नोंदवला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हे आमदार मुंबईत आले असता त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले होते. पुढील मंगळवारी या बंडखोर आमदारांचा फैसला होणार आहे. त्यापूर्वी हे बंडखोर आमदार देवदर्शन करत आहेत.

- Advertisement -

बंडखोर आमदार नागराज यांची प्रतिक्रिया 

मी राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी मला राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला, असं नागराज यांनी सांगितलं. ४० वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यावर आता सोबतच राहायला हवं आणि सोबतच मरायला हवं, असं शिवकुमार म्हणाले. प्रत्येक कुटुंबात चढ-उतार येतात. आपण सगळं विसरुन पुढे जायला हवं. नागराज यांनी सोबत राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे, अशी माहिती शिवकुमार यांनी दिली.

- Advertisement -

दुसरीकडे कर्नाटकच्या राजकीय घडामोडींनी आता वेगळेच वळण घेतले आहे. काँग्रेस- जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांनंतर जेष्ठ काँग्रेस नेते रोशन बेग आणि आमदार आनंद सिंह यांच्यासह पाच आमदारांनी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांच्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. विधानसभा अध्यक्ष मुद्दाम राजीनामे स्वीकारत नसल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. के. आर. रमेश कुमार विधानसभा अध्यक्षाची संवैधानिक जबाबदारी योग्य रित्यापार पाडत नसल्याचा आरोप करत आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -