घरताज्या घडामोडीबंडखोर आमदार पालघर पोलीस संरक्षणात सीमापार, पोलीस नियंत्रण कक्षाला होते इनपूट

बंडखोर आमदार पालघर पोलीस संरक्षणात सीमापार, पोलीस नियंत्रण कक्षाला होते इनपूट

Subscribe
शिवसेनेचे बंडखोर आमदार पालघर पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्री महाराष्ट्र सीमापार सुरतला सुखरूप रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Rebel Sena MLAs cross border under Palghar police protection)
विधान परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने सायंकाळच्या सुमारास मुबंईहुन रवाना झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून त्यांचा ताफा तलासरीला पोचला. त्याठिकाणी पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा हजर होते. आमदारांनी महाराष्ट्राच्या सीमेबाहेर गुजरातला जाण्यासाठी खानवेल मार्गे जाणे पसंत केले. खानवेल मार्गे सिल्वासाहुन वापी मार्गे शिवसेनेचे ३० हून अधिक आमदार सुखरूपपणे सुरतला गेले.
विशेष म्हणजे सुरतला आमदारांना कोणताही बोभाटा न होता निघून जाण्यासाठी पालघरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बाळासाहेब पाटील यांनीच ९ जून २०२२ रोजीच दत्तात्रय शिंदे यांच्याकडे पोलसी अधिक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. पाटील यांनी आपल्या विश्वासातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेण्याची खबरदारी घेतली होती. त्यामुळेच शिवसेनेचे बंडखोर आमदार सहजपणे सीमापार झाले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील मानले जातात. पाटील ठाणे पोलीस दलात उपायुक्त होते. शिंदे यांनीच त्यांना पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच बदली करून आणले होते. त्याचा फायदा शिंदे यांना सुरतला पलायन करताना झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार सूरतला जाणार गेले आहेत याबाबतीत बोंबाबोंब सुरू असताना स्वतः पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी चेकपोस्टवर जाऊन सर्व गाड्यांची आपल्या नियंत्रणाखाली तपासणी केल्याचे समजते. पोलीस संरक्षणातच बंडखोर आमदार महाराष्ट्राबाहेर गेल्याने आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावर काय निर्णय घेतात हे  पाहावे लागेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -