घरमहाराष्ट्रराज्यात रेकॉर्डब्रेक वीजपुरवठा

राज्यात रेकॉर्डब्रेक वीजपुरवठा

Subscribe

२१ हजार ५७० मेगावॅट विजेची मागणी, वाढत्या उकाड्याचा परिणाम

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढत चाललेल्या तापमानामुळे राज्यात वीजेच्या मागणीत ही वाढ झाली आहे. परिणामी बुधवारी राज्यात रेकार्डब्रेक वीज पुरवठा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंतच्या वीजपुरवठ्यात हा आकडा सर्वाधिक असल्याचे महावितरणातर्फे जाहीर करण्यात आले आहे. महावितरणातर्फे बुधवारी २१ हजार ५७० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला आहे.

राज्यभरात सध्या वाढला आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महावितरणातर्फे दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी २१ हजार ५७० मेगावॅट विजेची मागणी करण्यात आली होती. जी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. ही मागणी आतापर्यंत नोंद झालेल्या कमाल वीज मागणीपेक्षा ८२५ मेगावॅटने जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१८ ला २० हजार ७४५ मेगावॅट इतक्या कमाल वीजमागणीची नोंद करण्यात आली होती. ही मागणी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ३२० मेगावेट म्हणजेच १८ टक्क्यांनी जास्त होती. वातावरणतातील बदलामुळे आणि कृषी पंपाकरिता लागणार्‍या विजेच्या मागणीतील वाढीमुळे एकूण विजेची मागणी वाढली आहे.

- Advertisement -

महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या महानिर्मितीकडून ७ हजार ८५३ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएल कंपनीकडून एकूण ४ हजार १३४ मेगावॅट तसेच खासगी प्रकल्प जसे अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लयू, एम्को इत्यादीकडून एकूण ४ हजार ५६७ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. तसेच नवीन व नवीकरणीय ऊजेर्र्च्या स्त्रोतामधून, सौरउर्जा १८६४ मेगावॅट, पवन ऊर्जेतून १५६ मेगावॅट आणि सहवीजनिर्मिती ९१२ मेगावॅट अशी एकूण २ हजार ९३२ मेगावॅट वीज उपलब्ध करुन दिली असल्याचे जाहीर केले आहे.

उर्वारित विजेची मागणी ही इंडियन एनर्जी एस्सचेंजमधून ५७५ मेगावॅट वीज खरेदी करुन व ९५० मेगावॅट कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करुन पूर्ण केली आहे. मेरिट ऑडर डिस्पॅचनुसार जास्त वीज दर असलेले मे.रतन इंडिया यांच्याकडून १०८० मेगावॅट, महानिर्मितीकडून ६३९ मेगावॅट आणि एनटिपीसीकडून ६४० मेगावॅट इतके एकूण २३५० मेगावॅट क्षमतेचे संच हे बंद केलेले असतानाही ही मागणी पूर्ण केलेली असल्याचे महावितरणाने जाहीर केले आहे. अशाप्रकारे महावितरणाने वातावरणामधील बदल व कृषिपंपाचा वापर यामुळे अचानक वाढलेली विजेची मागणी ही उपलब्ध सर्व स्त्रोतांचा प्रभावीपणे वापर करुन वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. तसेच मार्च व एप्रिल या महिन्यातील अपेक्षित विजेची मागणी लक्षात घेता महावितरणाने सदर वीज मागणी पूर्ण करण्यासाठी तयारी केली होती, असे महावितरणाने जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -