घरमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यास नकार

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यास नकार

Subscribe

महापालिका आणि निवडणूक आयोगाची टोलवाटोलवी

लाव रे व्हिडीओ… म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्याविरोधात रान उठवल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ माजू लागली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट् पिंजून काढल्यानंतर मुंबईतही सरकारचा पर्दाफाश करण्याची तयारी केली आहे. परंतु मुंंबईतील राज ठाकरे यांच्या सभेला महापालिका तसेच निवडणूक अधिकार्‍यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला अप्रत्यक्षपणे रोखण्याचा प्रयत्न सुरु असून त्यानंतरही ते कशाप्रकारे सभा घेतात आणि मोदी व शहा यांचे पितळ कसे उघडे पाडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसलेल्या मनसेने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्ीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ एप्रिलपासून नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, कराड, खडकवासला आणि रायगड महाड येथील सभा घेत महाराष्ट् भाजपविरोधात ढवळून काढला. या सभांमध्ये व्हिडीओ लावून पंतप्रधानांच्या योजनांचा पर्दाफाश ते करत आहेत. त्यामुळे त्यांच्या लाव रे व्हिडीओ… हा संवाद चांगलाच व्हायरल झाला असून त्याचा धसकाही आता भाजपने घेतला आहे.

- Advertisement -

मुंबईत चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी २३ किंवा २४ एप्रिल रोजी मुंबईतील शिवडी आणि भांडुपमधील सभांसाठी अनुक्रमे महापालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ व ‘एस’ विभाग कार्यालयात परवानगीसाठी अर्ज केले आहे. परंतु महापालिकेच्या कार्यालयांमधून निवडणूक कार्यालयाकडून परवानगी घेण्याचे सांगण्यात येते. परंतु निवडणूक कार्यालयात अर्ज केल्यास, आपले उमेदवार नसल्याने आपल्या पक्षाला परवानगी आम्ही देवू शकत नाही,असे उत्तर देत परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहोत. त्यामुळे या टोलवाटोलवीमुळे मनसेचे पदाधिकार्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

\मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, राजसाहेबांच्या सभांना लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता भाजपच्या पायाखालील वाळू आता सरकू लागली आहे. त्यामुळे त्यामुळे महापालिकेचे आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. परंतु त्यांनी परवानगी देवा अथवा न देवा. आम्ही मुंबईत सभा घेणारच असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -