घरमहाराष्ट्रमुंबईकरांना दिलासा

मुंबईकरांना दिलासा

Subscribe

एकाच दिवसात १० हजार दशलक्ष लिटर्स पाण्याची वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये एका दिवसांत १० हजार लिटरचा पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा तीन दिवसांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आणि नाशिकला झोडपून काढल्यानंतर तलावातील पाणी साठ्यात वाढ होवू लागली आहे. त्यामुळे अशाचप्रकारे पावसाचा जोर धरण क्षेत्रात सुरु राहिल्यास भातसासह राज्य सरकारच्या धरणातील उचलला जाणारा राखीव साठ्यातील पाणी उचलण्याचे संकट दूर होवून पाणी साठ्यात वाढ होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुबईला दरदिवशी तानसा, विहार,तुळशी, अप्पर वैतरणा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि भातसा आदी धरणांमधून ३७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होता. परंतु सध्या मुंबईत लागू केलेल्या पाणीकपातीमुळे मुंबईकरांना ३५०० दशलक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. यासर्व धरणांमध्ये २८ जून पर्यंत साडेचार टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध होता. परंतु २९ जून रोजी यासर्व धरणांमध्ये ७७ हजार ५०५ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा होता. परंतु पाणीसाठा रविवारी सकाळी ८७ हजार ६४८ लिटर्स एवढा नोंदवला गेला.

- Advertisement -

त्यामुळे एका दिवसात १०हजार दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा वाढला असून सध्या होणार्‍या पाणी पुरवठ्यानुसार मुंबईकरांसाठी ३ दिवसांचा पाणी साठा वाढला असल्याचे दिसून येते. मुंबईकरांची वर्षभराची एकूण तहान १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढी आहे. पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा (०.२८ मीटर), मोडकसागर (०.१५ मीटर), तानसा (०.३८मीटर), मध्य वैतरणा (०.६३ मीटर), भातसा (०.८९ मीटर), विहार (०.२७ मीटर), तुळशी (०.३९ मीटर) आदी धरणांच्या पाण्याच्या पातळीत रविवारी सकाळी एवढी वाढ झाली आहे.

धरण ——- पाण्याची पातळी—— कमी पातळी—– आजची पातळी—– आजचा पाउुस

- Advertisement -

——–(मीटरमध्ये) ——-(मीटरमध्ये)—– (मीटरमध्ये) ——(मि.मी)

अप्पर वैतरणा—६०३.५१———५९५.४४———-५८९.१६———- २०

मोडकसागर—१६३.१५———-१४३.२६———-१४९.६२———–६३

तानसा —–१२८.६३———-११८.८७———-११९.५६———–८९

मध्यवैतरणा-२८५———–२२०.००———–२४९.९३———-३२

भातसा——१४२.०७——-१०४.९०———–१०५.१५———-७४

विहार——८०.१२——–७३.९२————७५.०१————८३

तुळशी—–१३९.१७——-१३१.०७———–१३४.७८———-८५

तलावांमधील रविवारपर्यंतचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा :एकूण २ लाख २७हजार ०४७ दशलक्ष पाण्याच्या तुलनेत शुन्य पाणी साठा

मोडकसागर : एकूण १ लाख २८हजार ९२५ दशलक्ष पाण्याच्या तुलनेत ३२,४४७ दशलक्ष पाणी साठा

तानसा : एकूण १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष पाण्याच्या तुलनेत ०७,४४७ दशलक्ष पाणी साठा

मध्य वैतरणा : एकूण १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष पाण्याच्या तुलनेत ३७,६१५ दशलक्ष पाणी साठा

भातसा: एकूण ७ लाख १७ हजार ०३७ दशलक्ष पाण्याच्या तुलनेत ३,१०२ दशलक्ष पाणी साठा

विहार : एकूण २७ हजार ६९८ दशलक्ष पाण्याच्या तुलनेत ४,०४२ दशलक्ष पाणी साठा

तुळशी : एकूण ८हजार ०४६ दशलक्ष पाण्याच्या तुलनेत २,९९५ दशलक्ष पाणी साठा

सर्व धरणांमधील वर्षभराचा एकूण अपेक्षित साठा : १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स

उपलब्ध साठा : ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -