Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी निर्यात बंदीमुळे अडकलेला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करा, मनसेचा केंद्र सरकारला सल्ला

निर्यात बंदीमुळे अडकलेला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करा, मनसेचा केंद्र सरकारला सल्ला

निर्यात बंदीमुळे निर्यातीसाठी असलेला रेमडेसविरचा मोठा साठा पडून

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच रुग्णांना बेड,आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णाला लवकर बरे करण्यासाठी वापरात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा संपूर्ण देशातच तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन निर्यात बंदीमुले निर्यातीसाठी असलेला रेमडेसिवीरचा साठा पडून आहे. त्याला विकायची परवानगी मिळवून जर तो साठा उपलब्ध झाला तर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असा सल्ला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. निर्यात बंदीमुळे निर्यातीसाठी असलेला रेमडेसविर चा मोठा साठा पडून आहे. परंतु तो अजून विकायची परवानगी नाही , त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती परवानगी घेऊन तो साठा त्वरित उपलब्ध करून दिल्यास मोठया प्रमाणात सोय होईल असे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

- Advertisement -

देशात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर औषधाचे वापर करण्यात येत आहे. याचा फायदा काही नफेखोरांनी उचलायाला चालू केले आहे. तसेच देशातील रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही रेमडेसिवीर औषध लवकर पुरवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच देशातून या औषधाची निर्यातही स्थगित केली आहे. परंतु या स्थगितीमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा अडकून पडला आहे. तोच साठा पुन्हा देशात वापरण्यात आला तर मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. निर्यातीसाठी पाठवण्यात आलेला माल निर्यात रद्द केल्यामुळे अडकून पडला आहे. त्यामुळे या साठ्याचा पाठपुरावा करुन अवश्यक त्या परवानग्या घेतल्या आणि हा साठा पुन्हा देशात वापरला तर यातून अनेकांना मोठा फायदा होऊ शकतो.

- Advertisement -