घरCORONA UPDATECorona Vaccine : कोरोनाची लस जून महिन्यात येणार; भारत बायोकेटने दिले संकेत

Corona Vaccine : कोरोनाची लस जून महिन्यात येणार; भारत बायोकेटने दिले संकेत

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूवरील लसीची प्रतिक्षा केली जात आहे. अशात भारत बायोटेक कंपनीने ही लस पुढील वर्षातील जून महिन्यात लाँच केली जणार असल्याचे संकते दिले आहे. रूस, अमेरिका आणि चीन सारख्या देशांनंतर भारतातही कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजून मिळाली आहे. ही लस भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन ज्याला इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचा दर्जा मिळालेला आहे. ते विकसित करत आहेत. भारत बायोटेकच्या मते ह्युमन ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर कोव्हॅक्सिन जून २०२१मध्ये तयार होईल. तसेच जर सरकार याचा वापराची मंजूर दिली तर लस त्याआधीदेखील तयार होऊ शकते, असे या कंपनीच्या वरिष्ठांनी म्हटले आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेक इंटरनॅशनलचे सहसंचालक साई प्रसाद यांच्या मते तिसऱ्या पट्ट्यातील १२ – १४ राज्यात तब्बल २० हजाराहून अधिक जणांना या लसीची चाचणी केली जाईल. जर आम्हाला सर्व प्रकारच्या चाचण्यांची परवानगी मिळाली तर २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल हाती येतील. म्हणजेच एप्रिल, मे आणि जून पर्यंत लसीच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल पूर्णपणे समजू शकतील.

- Advertisement -

दरम्यान, ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीची कोरोना लस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली असून अवघ्या ४२ दिवसात म्हणजेच सहा आठवड्यांमध्ये ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीची कोरोना लस तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबतचा अहवाल काही दिवसांपूर्वी express.co.uk छापून आला होता. या अहवालानुसार ब्रिटेन सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि इंपेरियल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक लसीच्या जवळ पोहोचले आहेत, असे नमूद करण्यात आले होते.

हेही वाचा –

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची बाधा; स्वतः ट्वीट करून दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -