घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंधश्रध्दा निर्मुलन कायद्या रद्द करा, साधू-महंत आक्रमक; 'त्यांनी' सिद्ध केल्यास ५१ लाखांचे...

अंधश्रध्दा निर्मुलन कायद्या रद्द करा, साधू-महंत आक्रमक; ‘त्यांनी’ सिद्ध केल्यास ५१ लाखांचे बक्षीस

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रात असलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत कमालीचे आक्रमक झाले असून या संदर्भात सोमवारी नाशिक येथे साधु महंतांची बैठक पार पडली. यानंतर हा कायदा रदद करण्याच्या मागणीसाठी रामकुंड येथे साधू महंतांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

रामकुंड तीर्थावर झालेल्या आंदोलनप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सियावर रामचंद्र की जय, जो हिंदु हित की बात करेगा, वो ही देशपर राज करेगा, सनातन हिंदु धर्म की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता. गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोधात साधू संत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे नागपूरमध्ये आगमन झाले होते. यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून वाद निर्माण झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना खुले आव्हान दिले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमध्ये केलेले दावे सिद्ध करून दाखवावे असे थेट जाहीर आव्हान केले होते. चमत्कार दाखवा आणि तीस लाख रुपये मिळवा, असे आव्हान दिले होते. मात्र यानंतर दिलेल्या धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी नागपूरातून काढता पाय घेतला.

- Advertisement -

नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे तीन दिवस अगोदरच नागपुरातून ते रायपूरमध्ये रवाना झाले. त्यामुळे अंनिसने या विरोधात तक्रार दाखल केली. हे सगळे प्रकरण सध्या गाजत असून याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साधू महंत एकत्र आले आहेत. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी आवाहन करत नाशिकमधील साधू म्हणून त्यांना एकत्र केले आहे. त्यानुसार नाशिकच्या रामकुंड परिसरात बैठक घेण्यात येउन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बैठकीत जुन्या आखाडयाचे महंत हर्षद भारती महाराज, काळाराम मंदिराचे महंत सुधीदास पुजारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, गजु घोडके, हिंदु एकता आंदोलन पक्ष रामसिंग बावरी तसेच दहा आखाडयांचे प्रतिनिधींनी ऑनलाईन उपस्थिती लावली. तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

५१ लाख रुपयांचे पारितोषिक

नाशिकमधील सर्व साधू महंत एकवटले असून राज्य सरकारला निवेदन करणार आहे की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रात ना लवकरात लवकर रद्द करावा कारण या कायद्याचा जो उद्देश कुठेतरी भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री जोशी यांनी केली आहे. तसेच अनेकदा मौलाना, पादरी, भंते यांच्याकडून चमत्कार सिद्ध करावयाचे दावे केले जातात. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले तर आम्ही 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, असे आव्हानही अनिकेत शास्त्री यांनी दिले आहे.

- Advertisement -
बागेश्वर बाबांचा चमत्काराचा दावा नाही

बागेश्वर बाबांविषयीची भूमिका स्पष्ट करताना महंत अनिकेत शास्त्री म्हणाले, ’बागेश्वर बाबा यांनी कधीही आणि कुठेही आपल्याकडे अद्भुत शक्ती असल्याचा दावा केलेला नाही. महाराजांकडे गेल्यामुळे माझे कल्याण झाले, असे त्यांच्या भक्तांचे म्हणणे आहे. केवळ या कारणावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत असेल तर ते चुकीचे आहे. बागेश्वर धामचे कार्य चांगले आहे. परंतु ते जर माझ्याकडे अद्भुत शक्ती आहे, असा दावा करत असतील तर ते सुद्धा निंदनीय आहे. त्याचे समर्थन सनातन धर्माने कधीही केलेले नाही, असेही महंत अनिकेत शास्त्री यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -