घरदेश-विदेशRepublic Day 2023 : राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नाही

Republic Day 2023 : राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नाही

Subscribe

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणारं विविध राज्यांचं चित्ररथ संचलन हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यात महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीचं एक चर्चेचा विषय ठरतो. मात्र यंदा या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्याची शक्यता आहे. या संचलनाच्या अंतिम निवडीत 14 राज्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे, पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही.

भारतातील एकूण राज्यांची संख्या अधिक असल्यामुळे दरवर्षी एका नियोजित वेळेत ठराविक संख्येत राज्यांच्या चित्ररथांची निवड होते. यात जर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडला गेला असता तर यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तीपीठांच्या देखाव्यासह काही वेगवेगळे प्रस्ताव ठेवले होते. पण रोटेशन पद्धतीने राज्यांची निवड होत असल्याने यंदा महाराष्ट्राला संधी नसणार असे म्हटले जात आहे. यापूर्वी 2020 मध्येही महाराष्ट्राच्या चित्ररथाला परेडमध्ये संधी नव्हती. त्यानंतर दोन वर्षांच्या गॅपनंतर महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राज्यपथावरील सर्व कार्यक्रमांसाठी वेळेचे नियोजन केलेले असते, त्या ठारावीक वेळातचं सर्व कार्यक्रम केले जातात. यात चित्ररथांचे संचलन हा देखील एक कार्यक्रम असतो. त्यात विविध राज्यांना चित्ररथाच्या माध्यमातून आपल्या राज्याचे वेळपण संसकृती दाखवण्याची संधी मिळते. मात्र दरवर्षी काही ठराविक राज्यांनाच यात संधी मिळत असते.

- Advertisement -

दरम्यान प्रजासत्तादिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच अनेकांना भावतो, आवडतो. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या चित्रकरथाची फार चर्चा असते. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी नव्हता. यानंतर महाराष्ट्राचा संचलनातील सहभाग अनेकांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक पटकावला. यानंतर 1993, 1994, 1995 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले. यात पंढरीच्या वारीवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. यानंतर 2018 मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षीचा चित्ररथ जैवविविधता या विषयावर आधारित होता. परंतु 2020 पासून महाराष्ट्राच्या चित्ररथावरून राजकारण रंगताना दिसतेय.


सीमावादावर सरकारने ठराव तर…; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -