घरमहाराष्ट्रचौथ्या महिन्यांतच बाळाला डोळ्यांचा कर्करोग, वाडियामध्ये रेटिनोब्लास्टोमावर यशस्वी शस्त्रक्रिया

चौथ्या महिन्यांतच बाळाला डोळ्यांचा कर्करोग, वाडियामध्ये रेटिनोब्लास्टोमावर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

Retinoblastoma | चौथ्या महिन्यात बाळाला डौळ्यांचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांत वाडिया रुग्णालयाने बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. बाळ आता सहा महिन्याचे असून सुखरूप आहे.

मुंबई – अवघ्या चौथ्या महिन्यातच बाळाला डोळ्यांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्याने वाघे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मात्र, परळ येथील वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी चिमुकल्याच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळाचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ऑप्थॅल्मिक आर्टरी केमोथेरपी ही इंटरव्हेंशन रेडिओलॉजिस्टद्वारे केलेली एक अतिशय विशेष प्रक्रिया वाडिया रुग्णालयात पार पडली आहे.

तनिश वाघे नावाच्या चार महिन्याच्या बालकाचा डोळा तिरळा असल्याने स्थानिक डॉक्टराने बालकाच्या पालकांना वाडिया रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. पाच वर्षांखालील बालकांमध्ये हा दुर्मिळ प्रकार आढळून येतो, अशी माहिती हेमॅटोलॉजी-ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता मुदलियार यांनी दिली.

- Advertisement -

कशी झाली शस्त्रक्रिया?

डॉ. संगीता मुदलियार यांनी सांगितले की, लहान मुलांमधील डोळ्यांचा कर्करोग हा दुर्मिळ असला तरी योग्य उपचारांसाठी अनेक धोरणांची गरज असते. बाळाचे डोळे वाचवण्यासाठी यशस्वी ऑप्थॅल्मिक आर्टरी केमोथेरपी प्रक्रिया असून अशी प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये प्रथमच पार पडली. केमोथेरपीद्वारे शरीरातील शिरामध्ये न जाता थेट ट्यूमर असलेल्या डोळ्याला कर्करोगविरोधी औषध दिले जाते. बाळाला ऑप्थॅल्मिक आर्टरी केमोथेरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाठी केमोथेरपीची २ चक्रे नियोजित केली. ही प्रक्रिया ओपीडीच्या आधारे करण्यात आली आणि त्यानंतर बाळाला घरी सोडण्यात आले.

- Advertisement -

रेटिनोब्लास्टोमा हा अनुवांशिक आजार आहे. कुटुंबात आधी कोणाला हा आजार झाला असेल तर बाळाळाही होण्याचा धोका असतो. मात्र, यावर वेळीच उपाचर झाले तर संभाव्य अडचणी टाळता येतात, अशी माहिती वाडिया हॉस्पिटलच्या संचालिका डॉ मिनी बोधनवाला यांनी दिली.

या रोगाची लक्षणे काय

  • डोळ्यात पांढरी चमक येणे
  • चकाकी,
  • दृष्टीदोष, कमी दिसणे
  • छायाचित्रांमध्ये रेड आय नसणे किंवा बुबुळाच्या रंगात होणारा बदल इत्यादी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -