घरमहाराष्ट्र...तर नवा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो; रोहित पवारांचा सरकारला सल्ला

…तर नवा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो; रोहित पवारांचा सरकारला सल्ला

Subscribe

केंद्र सरकार सध्या एम्ब्रेअर आणि सुखोई कंपन्यांसोबत भारतामध्ये नवा प्रकल्प आणण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प गुजरात राज्यात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा आणि राज्य सरकारने यासाठी प्रयत्न केल्यास ते शक्य होईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

केंद्र सरकार सध्या एम्ब्रेअर आणि सुखोई कंपन्यांसोबत भारतामध्ये नवा प्रकल्प आणण्याच्या तयारीत आहे. याबाबतची चर्चा देखील करण्यात येत आहे. सध्या भारतात अनेक विमाने तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत सध्या एम्ब्रेअर आणि सुखोई सोबत भागीदारी होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात लवकरच १०० पेक्षा कमी सीट्स असलेली विमाने बनविण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. तर हा प्रकल्प गुजरात राज्यात सुरु करण्यात येणार आहे. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

या प्रकल्पाबाबतचे एक ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “100 पेक्षा कमी सीट्स असलेली विमाने बनवण्यासाठी केंद्र सरकार #Embraer_SA , #Sukhoi सारख्या कंपन्यांसोबत चर्चा करत असून आपल्या देशात हि विमाने बनविली जाणार आहेत. हा नवा प्रकल्प गुजरात मध्ये होईल असं बोललं जात आहे.”

- Advertisement -

पुढे आणखी एक ट्वीट करत रोहित पवार यांनी राज्य सरकारला एक सल्ला देखील दिला आहे. “महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे आग्रह केल्यास नवा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो. आपल्याकडे #मिहान मध्ये क्षमता आहे तसंच #HAL_नाशिक कडे तर प्रत्यक्ष अनुभव देखील आहे. शासनाने प्रयत्न करायला हवेत. @CMOMaharashtra” याआधी देखील याबाबतचे एक ट्वीट फेब्रुवारी महिन्यात रोहित पवार यांच्याकडून करण्यात आले होते.

दरम्यान, याआधीच पाच प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. यामध्ये वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा समूहाच्या एअरबस या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे कमीत कमी एक तरी चांगला प्रकल्प महाराष्ट्रात यावा, अशीआशा व्यक्त करण्यात येत आहे. तर जे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत, त्या बाबतची श्वेतपत्रिका येत्या १५ ते २० दिवसांत काढणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली आहे.


हेही वाचा – बारावी परीक्षेतील गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -