घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईसाठी भाजपची ७ महिन्यांपुर्वी बैठक झाली, रोहित पवारांचा खळबळजनक...

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईसाठी भाजपची ७ महिन्यांपुर्वी बैठक झाली, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांद्वारे कशाप्रकारे कारवाई करण्यात येईल यासाठी भाजपने बैठक घेतली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. केंद्रीय यंत्राणंद्वारे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे नेते आणि मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चौकशी करण्यात येत आहे. सरकार पडत नसल्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. तर रोहित पवार यांनी भाजपने नेत्यांवर कारवाई करण्यासाठी बैठक घेऊन रणनिती आखली असा खळबळजनक दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय यंत्रणांद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईवरुन रोहित पवारांनी सांगितले की, भाजपची मोठी बैठक ६ ते ७ महिन्यांपुर्वी झाली होती. राज्याचे प्रश्न बाजूला सारुन त्या बैठकीत एवढीच चर्चा झाली की, महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या मदतीने काय कारवाई करता येईल. याबाबतची चर्चा त्या ठिकाणी झाली त्याबाबतचे पत्रही केंद्र सरकारला दिले. परंतु त्या पत्रामध्ये आपल्या राज्याचे अडकलेल्या पैशांबाबत एकही शब्द काढण्यात आला नाही असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

राज्याच्या विषयावर विरोधकांचे केंद्राला पत्र नाही

महाराष्ट्रात जसे वादळ आले होते तसे गुजरातला आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तात्काळ हजार कोटी रुपये मदतीसाठी दिले. आपल्या राज्यासाठी एकही रुपया दिला नाही. परंतु यावर चर्चा भाजपमध्ये करण्यात आली नाही. भाजपने मदतीसाठी एक पत्रही केंद्र सरकारला दिले नाही असे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

लसीकरणाच्या श्रेयावरुन रोहित पवारांचा निशाणा

जेव्हा आपल्या देशात लसीकरणाचा तुटवडा होता. लसीकरण पहिल्या लाटेच्या वेळीच मोठ्या प्रमाणात झाले असते तर कदाचित दुसरी लाट आली नसती. परंतु आपण समजू शकतो काही अडचणी या असू शकतात. ज्यावेळी लसीकरणाची घोषणा केली तेव्हा काही लोकांना विकत आणि फुकट देऊ असे जारहीर केले होते. परंतु केंद्राने राज्यांवर जबाबदारी टाकली होती यानंतर चर्चा झाली हायकोर्टाने केंद्राला सवाल केल्यावर केंद्र सरकारने सर्वांना मोफत लसीकरणाची भूमिका घेतली. जर पहिल्यापासूनच लसीकरण झाले असते तर आपण केव्हाच मोठ्या प्रमाणात लसीकरण केले असते. लसीकरणाचे श्रेय हे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, लसीकरण करणारे आणि लोकप्रितीनिधी यांचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सरकार पडत नसल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे कारवाई, जयंत पाटील यांचा केंद्रावर निशाणा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -