घरताज्या घडामोडीमुंबईतील हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबईतील हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

Subscribe

मुंबईतील महालक्ष्मी येथील हाजीअली दर्ग्यावर हल्ला करणार असल्याचा धमकीचा फोन आल्याचा माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचा फोन आला आहे.

मुंबईतील महालक्ष्मी येथील हाजीअली दर्ग्यावर हल्ला करणार असल्याचा धमकीचा फोन आल्याचा माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी दुपारच्या हा धमकीचा फोन आल्याचे समजते. (rumor call again to mumbai police terrorists attack to hajiali)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करणार असल्याचा मुंबई पोलिसांना फोन आला. हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या फोनची तपासणी केली. या तपासणीवेळी हा फोन उल्हासनगरमधून आल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, याआधीही मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याबाबत धमकीचे फोन आले होते. ऐन दिवाळीत मुंबईतील तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा फोन कंट्रोल रुमला आला होता. त्यानुसार, अंधेरीतील इन्फिनीटी मॉल, जुहूतील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून हल्ला करण्याची धमकी या फोनवरुन देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हे तीनही ठिकाण मुंबईतील गर्दीची ठिकाण आहेत. त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी तसेच तपासणी केली.

20 ऑगस्ट 2022 ला देखील मुंबई पोलिसांना धमकीचा मॅसेज आला होता. यात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी अज्ञातांनी दिली होती. त्यावेळीही पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला होता, मात्र हा फोनकॉल देखील खोटा आणि अफवेचा होता.

- Advertisement -

पोलिसांना अनेकदा असे फोन येत असतात. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून तात्काळ सुरक्षेचा आढावा घेतला जातो, तपासणी केली जाते. मात्र, नंतर अशा बातम्या खोट्या असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.


हेही वाचा – मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप, पण संतोष बांगरांचे कानावर हात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -