घरताज्या घडामोडीSachin Tendulkar : तंबाखूच्या जाहिरातींसाठी बऱ्याच ऑफर्स आल्या पण... तेंडुलकरचा मोठा खुलासा

Sachin Tendulkar : तंबाखूच्या जाहिरातींसाठी बऱ्याच ऑफर्स आल्या पण… तेंडुलकरचा मोठा खुलासा

Subscribe

राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲंबॅसेडर’ (smile ambadssador) म्हणून सचिनची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिनने सहमती दर्शवली असून आज त्याच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी मी देशासाठी खेळायला लागल्यावर माझ्याकडे बऱ्याच ऑफर्स आल्या, (तंबाखूच्या) अनेक कंपन्यांनी मला भरपूर पैसे ऑफर केले, पण मी कधीच त्यांची ऑफर स्वीकारली नाही, यासंदर्भातील खुलासा सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केला आहे.

तंबाखूच्या जाहिरातासाठी बऱ्याच ऑफर्स आल्या पण…

स्माइल अँबॅसेडर’ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे सचिनने भावना व्यक्त केल्या. मी देशासाठी खेळायला लागल्यावर माझ्याकडे बऱ्याच ऑफर्स आल्या. (तंबाखूच्या) अनेक कंपन्यांनी मला भरपूर पैसे ऑफर केले, पण मी कधीच त्यांची ऑफर स्वीकारली नाही. माझ्या बॅटवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कंपनीचा लोगो असायचा, पण दोन वर्ष बॅटवर कोणताही लोगो नव्हता. कारण तेव्हा मला तंबाखू कंपन्यांनी ऑफर दिली होती. स्टीकर बॅटवर लावण्यासाठी मला कोट्यवधी रुपये ऑफर करण्यात आले, पण मी ते कधीच स्वीकारले नाही. कारण मी जेव्हा भारतासाठी खेळायला लागलो, तेव्हा माझ्या बाबांनी (रमेश तेंडुलकर) माझ्याकडे एक वचन मागितले होते. तू कधीच तंबाखूचे प्रमोशन अथवा जाहिरात करणार नाहीस, असे मला वचन दे. ते वचन मी आजतागायत पाळले, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.

- Advertisement -

लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सचिन तेंडुलकर मदत करणार – देवेंद्र फडणवीस

अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आज झाला. वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने ओरल हेल्थ मिशन सुरू करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात गुटखा, सुपारी, सुगंधी सुपारी, तंबाखू अशा अनेक व्यसनांमुळे तरुणांना मुखाचे रोग आणि मुखाचा कर्करोग आढळून येत आहेत. त्यामुळे याबाबत जनजागृती करायची आहे. यासाठी भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी महाराष्ट्र शासनाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्र शासनासोबत पाच वर्षाकरीता निशुल्क करार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओरल हेल्थबाबतची जनजागृती आणि ज्याठिकाणी शिबिर भरवायची आहेत. यासाठी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सचिन तेंडुलकर मदत करणार आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘स्माईल अँबॅसिडर’ म्हणून योग्य व्यक्ती

ज्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्ती जेव्हा याविषयावर बोलतात आणि अपील करतात. त्याचा एक प्रचंड परिणाम हा तुरुणाईवर होतो. आपल्याला कल्पना आहे की, सचिन तेंडुलकर यांच्याबाबत तरुणांना आकर्षण आणि प्रेम आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की, या स्वच्छ मुख्य अभियानाचे ते ‘स्माईल अँबॅसिडर’ म्हणून योग्य व्यक्ती आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Devendra Fadnavis : सचिन तेंडुलकरबाबत तरुणांना खूप आकर्षण, फडणवीसांनी केलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -