घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवशाहीत आत्महत्या केलेल्या एसटी चालकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; महिला कंडक्टरसह तिघांवर गुन्हा...

शिवशाहीत आत्महत्या केलेल्या एसटी चालकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; महिला कंडक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल

Subscribe

नाशिक : नादुरुस्त शिवशाही बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणार्‍या राजेंद्र हिरामण ठुबे (४९) या चालकाच्या आत्महत्येप्रकरणी महिला वाहकासह तिची बहीण आणि दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाच्या खिशातील नोटांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

चालकाचे वडील हिरामण रघुनाथ ठुबे (७०) यांनी वावी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वाहक, तिची बहीण आणि अन्य दोघे ठक्कर बंधू (पूर्ण नाव माहित नाही) यांचे विरोधात चालक राजेंद्र ठुबे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोनवाडे (ता. नाशिक) येथील चालक राजेंद्र ठुबे हे २०१३ साली चालक म्हणून परिवहन महामंडळात भरती झाले. त्यांचे महिला वाहकाशी ओळख झाली. ओळखीतून महिलेने ठुबेंकडून ४ लाख ५८ हजार ९६१ रुपये उसने घेतले. त्यापैकी ६० हजार रुपये परत केले.

- Advertisement -

उर्वरित पैशांची ठुबे यांनी मागणी केली. पण महिला वाहकाने ते परत दिले नाही. पैसे मागितले म्हणून महिला वाहक, तिची बहीण आणि अन्य दोन ठक्कर बंधूंनी ठुबे यांना दमदाटी केली. या वारंवार होणार्‍या जाचाला कंटाळून ठुबे यांनी २४ मे रोजी रात्री पांगरी शिवारात नादुरुस्त शिवशाही बसमध्ये गळफास घेतला होता. त्यांच्या खिशातील मोबाईल आणि पैसे पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अंत्यविधीनंतर पैसे मोजत असताना कुटुंबियांना नोटांमध्ये सुसाईड नोट सापडली आणि त्यानंतर राजेंद्र ठुबे यांच्या आत्महत्येमागील कारण समोर आले.

काय घडले होते?

नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांगरी गावाजवळ नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही मध्ये बसच्या चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. कंबरेच्या करदोऱ्याच्या सहाय्याने बसच्या छताला लटकून फाशी घेतल्याची बाब समोर आली आहोती. राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार- १ चे चालक राजू हिरामण ठुबे (वय ४९) यांनी आपले जीवन संपवले होते. ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एमएच – ०९, इएम -१२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदेवस्ती जवळ येताच नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक निघून गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -