आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामाला क्रिकेट प्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायट्न्सयांच्यात शेवटचा आणि अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं गुजरात संघाचा पराभव केला आणि चेन्नई संघ आयपीएल २०२३ चा महाविजेता ठरला.
या सामन्यात सर्वाधिक कमालीची खेळी कोणी केली असेल तर तो म्हणजे रवींद्र जडेजा. अष्टपैलू रवींद्र जडेजाने शेवटच्या २ चेंडूत आपली तलवार चालवली आणि गुजरातला धूळ चारली.
शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या, मोहित शर्माच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर केवळ दोन धावा झाल्या. शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी १० धावांची गरज होती. जडेजाने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लॉगवर षटकार ठोकला. आता शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या, चाहते मारत होते, कर्णधार धोनी डोळे बंद करून या चेंडूची वाट पाहत होता, जडेजाने या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.
कालच्या सामन्यात चेन्नईचा फलंदाज शिवम दुबे याने स्लो खेळी करत संघाला धीर देण्याचे काम केले.
विजयाचा आनंद साजरा करत जडेजाने विजयी चौकार मारताच सीएसकेच्या पॅव्हेलियनकडे धाव घेतली आणि थेट धोनीकडे गेला. जडेजाला पाहताच धोनीने आनंदाने उडी मारली आणि त्याला उचलले. यादरम्यान धोनी खूप भावूक झाला आणि त्याने जडेजाला बराच वेळ घट्ट मिठी मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना परिवारवादावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. याच मुद्द्यावर आता काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी...
ODI World Cup 2023 : नवी दिल्ली : भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे (ODI World Cup 2023) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चक्क अंतराळातून...
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाच अंतिम सामना आज होणार आहे. चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि गतवर्षीचा आयपीएल विजेता...