घरनवी मुंबईसचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी बहाल, लाखों श्रीसदस्य उपस्थित

सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी बहाल, लाखों श्रीसदस्य उपस्थित

Subscribe

नवी मुंबई : देशाने मला काय दिले, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो, हे विचार आचरणात आणल्यास देशाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांनी श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टिबरेवाल विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात केले.

वाशी येथील प्रदर्शन केंद्रात रविवारी आयोजित एका विशेष दिमाखदार कार्यक्रमात श्री जगदीश प्रसाद झांबरमाल टिबरेवाल विद्यापीठाने सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करून त्यांचा सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. पूनम महाजन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनोद टिबरेवाल तसेच या विद्यापीठचे संचालक मंडळ, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कुटुंबीय तसेच लाखो श्री सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचार अनमोल आहेत. त्यांच्या विचारांची व ज्ञानाची खरी युनिव्हर्सिटी रेवदंडा येथे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, तसेच विद्यापीठाने सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या पदवीचा मानसन्मान वाढल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी संत वाङ्मयाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाला सुरुवात केली. त्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांचे कार्य जगासमोर आले म्हणूनच याच कार्याचा अनेक ठिकाणी गौरव होत आहे. सचिनदादा धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार हा श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याचे पद्मश्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांनी सांगितले.

- Advertisement -

आप्पासाहेब धर्माधिकारी हे ज्ञानाचे विद्यापीठ आहे आणि आज आपल्याला मिळालेली डॉक्टरेट ही पदवी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यामुळे मिळाली. नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचे सचिनदादा धर्माधिकारी यांनी सांगितले. हा गौरव खऱ्या अर्थाने श्री सदस्यांचा असल्याचेही ते म्हणाले.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या कार्याचा वसा अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी चालवत आहेत; त्यामुळे सचिनदादा धर्माधिकारी यांना ही पदवी बहाल करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे कुलगुरू विनोद टिबरेवाल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -