घरताज्या घडामोडीश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ, उद्या मुख्य दिवस

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ, उद्या मुख्य दिवस

Subscribe

उत्सवाचा शुक्रवारी विजयादशमीचा मुख्य दिवस, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साध्या पद्धतीने होणार साजरा

शिर्डी – साईबाबांच्या १०३ व्या पुण्यतिथी उत्सवाला गुरुवारपासून विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने सुरूवात झाली. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा शुक्रवारी (दि.१५) विजयादशमीचा मुख्य दिवस असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातोय.

सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांचे १९१८ मध्ये विजयादशमीच्या दिवशी महानिर्वाण झाले होते. तेव्हापासून दरवर्षी साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. आजपासून १०३ व्या पुण्यतिथी उत्सवाला सुरूवात झाली. अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर प्रशासनाला कोरोना नियमांचं पालन करावं लागतंय. दररोज केवळ १५ हजार भाविकांना ऑनलाईन पासच्या माध्यमातून दर्शन दिले जात आहे. दरवर्षी पुण्यतिथी उत्सवाला लाखो भाविक शिर्डीत येत असतात. मात्र, यावेळी मोजके पुजारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा केला जातोय.

- Advertisement -

साई समाधी मंदिरासह गुरुस्थान, द्वारकामाई, चावडी तसेच परिसरातील मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. तर मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघालंय. विजयादशमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असून भक्तांनी नियमांचे पालन करावं, असं आवाहन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केलंय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -