घरक्राइमसलमानला धमकी देणाऱ्याभोवतीचे फास आवळले; पोलिसांनी 'हे' उचलले पाऊल

सलमानला धमकी देणाऱ्याभोवतीचे फास आवळले; पोलिसांनी ‘हे’ उचलले पाऊल

Subscribe

मुंबईः अभिनेत सलमान खानला धमकी देणाऱ्या विरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. लुक आऊट नोटीस जारी झाल्यास आरोपी विमानाद्वारे भारतात आला किंवा विमानाद्वारे त्याने परदेशात जाण्याचा प्रयत्न केला तर  त्याला विमानतळावरच अटक केली जाते. त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली जाते. देशभरातील सर्व विमानतळांना ही नोटीस दिली जाते. त्यामुळे सलमानला धमकी देणाऱ्याला विमानतळावरच अटक होऊ शकते.

अभिनेता सलमान खानला मार्चमध्ये ई-मेल द्वारे धमकी मिळाली होती. सलमानच्या कर्मचाऱ्याला हा धमकीचा मेल आला होता. या मेलम्ध्ये सलमानला धमकी देण्यात आली होती. गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने. अगर नही देखा तो बोल देना देख लेगा. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे” असा इमेल पाठवण्यात आला. rohitgarg<[email protected]> या आयडीवरून हा मेल पाठवण्यात आला होता. पोलिसांत याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ईमेलद्वारे धमकी येण्याआधी गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमानला धमकी वजा इशारा दिला होता. पंजाबमधील गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्यानंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाले होते. तुझाही मुसेवाला करु अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्याला पिस्तुल बाळगण्याचा परवानाही देण्यात आला होता. हे पत्र ज्याच्या माध्यमातून आले त्या गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईची एका वृत्त वाहिनीने मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत बिश्नाेईने सलमानला धमकी वजा इशारा दिला होता.  सलमानने काळवीट शिकार प्रकरणात चूक केली आहे. आमच्या समाजाचा त्याने अपमान केला आहे. मला काही समाजाने पाठिंबा दिलेला नाही. मात्र त्याने माफी मागणे अपेक्षित आहे. ही धमकी न समजता विनंती समजून सलमानने माफी मागावी, असा इशारा बिश्नोईने त्या मुलाखतीत दिला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -