Lockdownमुळे आर्थिक परिस्थिती ढासळली, सलून व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

देणेकरांची देणी देण्यासाठी हातात पैसे नसल्याने नैराश्यात येऊन आत्महत्या

salon working employee committing suicide by hanging in jalgaon
Lockdownमुळे आर्थिक परिस्थिती ढासळली, सलून व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोना महामारीचा सर्वात मोठा फटका व्यावसायिकांना बसला. लॉकडाऊनच्या काळात अनेक लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले. कोरोना आटोक्यात आला असला तरी त्याचे परिणाम व्यापारी आणि सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. आज अनेक जण नैराश्यात येऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना जळगावातून समोर आली आहे. लॉकाडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थितीचा सामना न करु शकल्याने एका सलून व्यावसायिकाने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. (salon working employee committing suicide by hanging in jalgaon)  गजानन कडू वाघ असे ३५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला लटकलेला गजानन यांचा मृतदेह समोर आला. गजानन यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत गजानन वाघ यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. ते एक वर्षांपूर्वी जळगाव येथे स्थायिक झाले होते. जळगावच्या लक्ष्मीनगर एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गजानन यांना एका सलूनच्या दुकानात काम मिळाले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात सलून बंद पडले गजानन यांचे काम गेले. सुरुवातीला दुकान मालकांकडून त्यांना मदत मिळाली परंतु त्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घर चालवण्यासाठी त्यांनी इतकरांकडून काही पैसे घेतले. लॉकडाऊनच्या काळात हातात काम नसताना त्यांनी घेतलेल्या पैशांचे व्याज वाढत गेले आणि देणेकरांनी गजानन यांच्यामागे पैशासाठी तगादा लावला. देणेकरांची देणी देण्यासाठी हातात पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यात येऊन आत्महत्या केली.

रविवारी सकाळी गजानन यांच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने लटकून त्यांनी आत्महत्या केली होती. गजानन यांचा भाऊ इश्वर यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारच्या सुमारात गजानन यांच्यावर माळपिंप्री या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


हेही वाचा – कोरोना निर्बंधांचा व्यापारी वर्गाला आर्थिक फटका, ४ लाख व्यापारी संकटात