घरमहाराष्ट्रसर्वधर्मसमभाव हा गांडूळ विचार, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

सर्वधर्मसमभाव हा गांडूळ विचार, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

Subscribe

सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेला तोंड फोडलं आहे. सर्वधर्म हा गांडुळ विचार असून तो इतिहासाला धरून नसल्याचं संभाजी भिडे म्हणाले. बुधवारी सांगतील दुर्गामात दौड समारोप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी देशासाठी कलंक असतात.  सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे, हा इतिहासाला धरून विचार नाही, असे मत व्यक्त करत आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहिजे आहेत, पण इथेच बोंब आहे. साधी गोष्ट घ्या, लोक निवडून देतात, ते आमचे खासदार काय? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भाडोत्री. हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत, अशा सणसणीत शब्दांत भिडे गुरुजी यांनी राजकारण्यांवर पुरोगामी भूमिकेवर टीका केली आहे.

- Advertisement -

विजयादशमीच्या प्रथेप्रमाणे शिवप्रतिष्ठानच्या दुर्गमाता दौडची सांगता सांगतील करण्यात आली. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ वर्षांपासून सांगतील या दौडचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे दोन वर्षे दौडचे आयोजन करण्यात आले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -