Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र ऑक्सिजन अभावी मृत्यू न झाल्याचं ठाकरे सरकारचं हायकोर्टाला प्रतिज्ञापत्र; भाजपचा राऊतांवर पलटवार

ऑक्सिजन अभावी मृत्यू न झाल्याचं ठाकरे सरकारचं हायकोर्टाला प्रतिज्ञापत्र; भाजपचा राऊतांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

देशात ऑक्सिजन अभावी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असं लेखी उत्तर केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिलं. केंद्राच्या या उत्तरानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान, केंद्राच्या या उत्तरानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्राच्या या उत्तरानंतर धक्काच बसला असं म्हटलं. यावर भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी उत्तर दिलं आहे.

संबित पात्रा यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना संजय राऊत आणि महाराष्ट्र सरकारवर देखील टीकास्त्र डागलं आहे. “संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे,” असं संबित पात्रा म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचं औरंगाबाद खंडपीठाला सांगितल्याचा दाखला संबित पात्रा यांनी दिला. “महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्रात हे सांगितलं आहे की महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारणा केल्यानंतर त्यावर राज्य सरकारनं उत्तर दिलं आहे,” असं संबित पात्रा म्हणाले.

इक्बालसिंह चहल देखील म्हणाले…

खुद्द मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे की ऑक्सिजन तुटवडा झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केला होता. त्यानंतर लागलीच ऑक्सिजन पुरवठा झाला होता, असं संबित पात्रा यांनी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप करणं चुकीचं ठरेल. राज्यांकडून कदाचित चूक होऊ शकते, असं पात्रा म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisement -